पुणे। आयडीयाज् अ सास कंपनी यांच्या तर्फे स्वर्गीय अंकुर जोगळेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित 15व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी क्रिकेट 2018- 19स्पर्धेत टाटा टेक्नोलॅजीज्, सिनेक्रोन व आयबीएम या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला.
व्हिजन क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात स्वप्निल मुंगेलच्या दमदार अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टाटा टेक्नोलॅजीज् संघाने टिएटो संघाचा 7 गडी राखून दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना स्वप्निल मुंगेल व अक्षय ताम्हाणे यांच्या अचूक गोलंदाजीने टिएटो संघाचा डाव 20 षटकात 9 बाद 153 धावांत रोखला. 153 धावांचे लक्ष टाटा टेक्नोलॅजीज् संघाने केवळ 18.4 षटकात 3 बाद 156 धावा करून सहज पुर्ण केले. स्वप्निल मुंगेलने 54 चेंडूत नाबाद 87 धावा करून संघाला विजय मिळवून दिला. 26 धावांत 3 गडी बाद व 54 चेंडूत 87 धावा करणारा स्वप्निल मुंगेल सामनावीर ठरला.
लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदानावर झालेल्या सामन्यात संजय सिंगच्या आक्रमक फलंदाजीच्या बळावर सिनेक्रोन संघाने टॅलेंटीका संघाचा10 गडी राखून पराभव करत मोठा विजय संपादन केला. पहिल्यांदा खेळताना जमीर शेख, गजेंद्र झाल्टे व हर्षद जोशी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे टॅलेंटीका संघ केवळ 14.1 षटकात सर्वबाद 77 धावांत गारद झाला. 77 धावांचे लक्ष संजय सिंगच्या नाबाद 45 धावांसह सिनेक्रोन संघाने केवळ 6.1 षटकात एकही गडी नगमावता 79 धावा करून सहज पुर्ण केले. केवळ 17 चेंडूत नाबाद 45 धावा करणारा संजय सिंग सामनावीर ठरला.
अन्य लढतीत किरण लगडच्या आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर आयबीएम संघाने आयडीयाज् अ सास कंपनी संघाचा 7 गडी राखून पराभव करत उप-उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टिएटो – 20 षटकात 9 बाद 153 धावा(प्रशांत दुधाणे 55(50), गणेश अंब्रे 36, इम्तीयाझ शेख नाबाद 23(10), स्वप्निल मुंगेल 3-26, अक्षय ताम्हाणे 3-35) पराभूत वि टाटा टेक्नोलॅजीज्- 18.4 षटकात 3 बाद 156 धावा(स्वप्निल मुंगेल नाबाद 87(54), अमोल बाबर 20, धनाजी कालके 2-17) सामनावीर- स्वप्निल मुंगेल
टाटा टेक्नोलॅजीज् संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.
टॅलेंटीका- 14.1 षटकात सर्वबाद 77 धावा(अनुभव अरोरा 21(9), जमीर शेख 2-10, गजेंद्र झाल्टे 2-16, हर्षद जोशी 2-16) पराभूत वि सिनेक्रोन- 6.1 षटकात बिनबाद 79 धावा(कार्तिक हिरपारा नाबाद 30(20), संजय सिंग नाबाद 45(17)) सामनावीर- संजय सिंग
सिनेक्रोन संघाने 10 गडी राखून सामना जिंकला.
आयडीयाज् अ सास कंपनी- 17.1 षटकात सर्वबाद 94 धावा(परेश दहीवाल 22, निहार जोशी 22, किरण लगड 4-11, शिव प्रसाद 2-21, विनय पलुरू 2-4) पराभूत वि आयबीएम- 7 षटकात 3 बाद 95 धावा(गुरूप्रसाद कपाले नाबाद 23, धरमवीर सिंग नाबाद 50(15), तुषार महामुनी 2-19) सामनावीर- किरण लगड
आयबीएम संघाने 7 गडी राखून सामना जिंकला.