येत्या ४ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. येत्या २० जुलैपासून भारतीय संघ आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हन यांच्यात सराव सामना खेळला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघातील खेळाडूंमध्ये आणखी एक रंगतदार सामना रंगला आहे, ज्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
सराव सामना सुरू होण्याच्या एक दिवसापुर्वी भारतीय संघातील खेळाडू मैदानात कसून घाम गळताना दिसून आले आहेत. त्यावेळी क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांच्या देखरेखीखाली फिल्डींग ड्रील्सचा एक सामना कोहली-रोहित आणि अश्विन-पुजारा यांच्यात पाहायला मिळाला. कर्णधार विराट कोहली हा फिटनेसवर जास्त लक्ष देत असतो. त्याची फिटनेस पाहून संघातील इतर खेळाडूंनाही प्रेरणा मिळाली आहे.
शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर श्रीधर यांनी म्हटले की, “या प्रकारच्या ड्रील्स्मुळे खेळाडूंमध्ये खेळ भावना वाढते आणि फिटनेसचा स्तरही उंचावतो. दोन्ही संघांमध्ये अटीतटीचा सामना पहायला मिळाला होता. परंतु शेवटी रोहित आणि विराटच्या संघाने बाजी मारली.” (Team ashwin pujara lost to team Kohli rohit watch video)
Two squads 🤜🤛
Fielding drills 🙌A run-through #TeamIndia's fun drill, courtesy fielding coach @coach_rsridhar ahead of their practice session 👊 – by @RajalArora #ENGvIND pic.twitter.com/NXZ4LI0aPR
— BCCI (@BCCI) July 19, 2021
भारतीय संघातील खेळाडूंनी विश्रांतीनंतर जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना २३ जून रोजी संपला होता. त्यानंतर भारतीय खेळाडूंना २० दिवसांची सुट्टी देण्यात आली होती. सुट्टी संपल्यानंतर भारतीय संघ सराव करण्यात व्यस्त आहे. भारतीय संघ आणि सिलेक्ट काउंटी इलेव्हेन यांच्यात २० जुलै ते २२ जुलै दरम्यान सराव सामना खेळला जाणार आहे.
इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची कसोटी मालिका
पहिली कसोटी- ४ ते ८ ऑगस्ट, नॉटिंघम
दुसरी कसोटी- १२ ते १६ ऑगस्ट, लॉर्ड्स
तिसरी कसोटी- २५ ते २९ ऑगस्ट, लीड्स
चौथी कसोटी- २ ते ६ सप्टेंबर, द ओव्हल
पाचवी कसोटी- १० ते १४ सप्टेंबर, मॅनचेस्टर
महत्त्वाच्या बातम्या-
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर शुबमनने बदलला ‘लूक’, पाहा फोटो
आता मंत्रीच खेळणार क्रिकेट, क्रीडामंत्र्याची झालीय संभाव्य रणजी संघात निवड
SLvIND: दुसरा वनडे जिंकत भारताला डबल फायदा, मालिकाही जिंकणार अन् पाकिस्तानलाही पछाडणार