दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या महिला टी20 विश्वचषकात बुधवारी (15 फेब्रुवारी) भारत विरुद्ध वेस्ट इंडीज हा सामना खेळला गेला. केपटाऊन येथे झालेला ब गटातील हा सामना भारतीय संघाने 6 गडी राखून आपल्या नावे केला. यासह भारताने सलग दुसरा विजय संपादन करत ब गटातून अव्वलस्थानी झेप घेतली. गोलंदाजीमध्ये अष्टपैलू दीप्ती शर्माने तर फलंदाजीत कर्णधार हरमनप्रीत कौर व रिचा घोष यांनी शानदार फलंदाजी करत भारताचा विजय सुकर केला.
T20 WC 2023. India Women Won by 6 Wicket(s) https://t.co/rm4GUZIzSX #INDvWI #T20WorldCup
— BCCI Women (@BCCIWomen) February 15, 2023
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारतीय संघाने या सामन्यात सलग दुसऱ्या विजयाच्या इराद्याने पाऊल ठेवले. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम गोलंदाजी करताना भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी केली. पूजा वस्त्रकरने दुसऱ्या षटकात विरोधी संघाच्या कर्णधाराला बाद केल्यानंतर टेलर व कॅम्पबेल यांनी दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची भागीदारी केली. मात्र, दीप्ती शर्मा गोलंदाजीला आल्यानंतर वेस्टइंडीज संघाचे वाताहात झाली. तिने केवळ 15 भावांमध्ये तीन बळी मिळवले. यासह ती आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये शंभर बळी मिळवणारी पहिली भारतीय गोलंदाज बनली. वेस्ट इंडीज संघ निर्धारित 20 षटकात केवळ 6 बाद 119 धावा करू शकला.
या धावांचा पाठलाग करताना भारताला चांगली सुरुवात मिळाली. स्मृती मंधाना व शफाली वर्मा यांनी 3.3 षटकात 32 धावांची सलामी दिली. स्मृती बाद झाल्यानंतर जेमिमा रॉड्रिग्जही अपयशी ठरली. जम बसलेली शफाली 28 धावांवर बाद झाल्यानंतर भारतीय संघ अडचणीत सापडला होता. मात्र, कर्णधार हरमनप्रीत कौर व रिचा घोष यांनी संघाला अडचणीतून बाहेर काढले. दोघींनी खराब चेंडूंचा समाचार घेत 72 धावांची भागीदारी केली. विजयासाठी चार धावांची गरज असताना हरमन 33 धावा करत माघारी परतली. त्यानंतर रिचाने विजयी चौकार मारत भारताचा विजय साकार केला. तिने 32 चेंडूंवर 44 धावांची भागीदारी केली. दीप्ती शर्मा हिला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
(Team India Beat West Indies In Womens T20 World Cup Harmanpreet Richa Deepti Shines)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ना भुवी ना चहल! टी20 मध्ये बळींचे शतक बनवणारी पहिली भारतीय बनली दिप्ती
अय्यरचे दिल्लीमध्ये होणार टीम इंडियात कमबॅक? ‘या’ खेळाडूचा पत्ता कट