---Advertisement---

टीम इंडियाचा ‘गजनी’ कोण? रोहित शर्मानेच उघड केले गुपित…

---Advertisement---

भारत आणि बांग्लादेश यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका संपली आहे. ज्यामध्ये भारताने मालिका 2-0 ने एकतर्फी जिंकला. आता दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका होणार आहे. जी 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. याआधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो प्रसिद्ध शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या दुसऱ्या सीझनचा प्रोमो व्हिडिओ आहे.

या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि त्याचे सहकारी खेळाडू मस्ती करताना दिसत आहेत. या शोच्या एका प्रोमोमध्ये रोहित शर्माला एक मनोरंजक प्रश्न विचारण्यात आला होता. जो त्याच्या विसरण्याच्या प्रसिद्ध सवयीशी संबंधित होता. हा प्रश्न ऐकताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.

या मजेदार एपिसोडमध्ये अभिनेत्री अर्चना पूरण सिंहने रोहितला विचारले, “टीम इंडियाची गजनी कोण आहे?” हा प्रश्न ऐकून सर्व खेळाडू हसू लागले आणि प्रेक्षकही हसू लागले. रोहित शर्माने हसत उत्तर दिले, “हे खरे माझेच शीर्षक आहे.” त्याच्या या उत्तरामुळे शो आणखीनच मजेशीर झाला.

शॉर्ट टर्म मेमरी लॉस झालेल्या ‘गजनी’ चित्रपटातील पात्राप्रमाणेच रोहित शर्माच्या विसरण्याच्या सवयीची त्याच्या सहकाऱ्यांनी अनेकदा खिल्ली उडवली आहे. रोहित अनेकदा त्याचा फोन, आयपॅड, वॉलेट आणि पासपोर्टही विसरतो. असे त्याच्या सहकाऱ्यांनी अनेकदा सांगितले आहे. हे मजेदार संभाषण कपिल शर्मा शोच्या आगामी एपिसोडमध्ये दाखवले जाईल. जिथे चाहत्यांना त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना वेगळ्या शैलीत पाहायला मिळणार आहे.

प्रोमोमध्ये रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव, अर्शदीप सिंग, शिवम दुबे आणि अक्षर पटेल देखील या शोचा भाग असणार असल्याचे दाखवण्यात आले होते. टी20 विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादवने टी20 फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद स्वीकारले. तर रोहितने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.

हेही वाचा-

यशस्वी जयस्वालचा बंंपर फायदा, विराट कोहलीची आगेकूच, पाहा आयसीसीची ताजी रँकिंग
जसप्रीत बुमराहचा मोठा धमाका, कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी झेप! टॉप 5 गोलंदाज जाणून घ्या
रोहित शर्माच्या या ‘मास्टरप्लॅन’मुळे बांगलादेशचा पराभव, अश्विननं उघड केलं रहस्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---