टीम इंडीयाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात आहे. त्यासाठी गाैतम गंभीरचे नाव सध्या समोर येत आहे. गंभीरनेही पदभार स्वीकारण्यासाठी राजी असल्याची बातमी समोर आली होती. पण बीसीसीआय कडून कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. त्याआधी बीसीसीआय सचिव जय शहांनी स्पष्ट केले होते, या प्रतिष्ठीत पदासाठी योग्य व्यक्तीचीच निवड होईल.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने मंगळवारी म्हणाला सध्याचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या टीम इंडीयासाठी गेल्या अडीच वर्षात दिलेले योगदान अतुलनीय आहे. पण द्रविड यांनी ही जबाबदारी पुढे निरंतर करावी यासाठी आम्ही त्यांना विनंती केली होती. पण द्रविडने अधीच स्पष्ट केले आहे. टी20 विश्वचषक ही त्यांची शेवटची स्पर्धा आहे.
भारताच्या पहिल्या सामन्यापूर्वी पूर्वसंध्येला कर्णधार रोहित शर्मा म्हणाला “राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी पुन्हा घेण्यासाठी पटवून देण्याचा प्रयत्न केला पण काही गोष्टी आपल्या हतात नसतात. पण व्यक्तीगतरित्या त्यांच्या सोबत मी आनंदी आहे. तो पुढे म्हणाला जेव्हा मी आयरर्लंड मध्ये पदार्पण केले होते तेव्हा ते माझे पहिले आंतराष्ट्रीय कर्णधार होते. ते आम्हा सर्वांसाठी आदर्श आहेत.” असं तो म्हणाला.
रोहित राहुल द्रविड बाबत बोलताना पुढे म्हणाला, ‘आम्ही त्यांना खेळताना पाहत मोठे झालो आहोत. आम्हाला माहिती आहे की व्यक्तीगत रित्या यांनी काय मिळवले आहे. आम्ही मागील काही वर्षापासून संघासाठी त्यांनी केलेले योगदानाचे काैतुक करतो.’ रोहितने ‘वॉल’ चा संदर्भ देत म्हणाला, ‘संघाला कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी ते ओळखले जात होते.
रोहित-द्रविडच्या काळात भारताला अद्याप एकही आयसीसी ट्राॅफी जिंकता आलेली नाही, पण संघाच्या जडणघडणीत मुख्य प्रशिक्षकाचे योगदान मोठे आहे. मोठ्या ट्रॉफींव्यतिरिक्त, आम्ही सर्व प्रमुख स्पर्धा आणि मालिका जिंकल्या. त्याच्यासोबत काम करताना मी सर्व गोष्टींचा आनंद घेतला आहे. संघाला कोणत्या दिशेने जायचे आहे हे आम्ही ठरवले आहे.” द्रविडने नोव्हेंबर 2021 मध्ये संघाची जबाबदारी स्वीकारली होती.
महत्तवाच्या बातम्या-
रविचंद्रन अश्विन सीएसकेमध्ये परतला, फ्रँचायझीनं आयपीएल 2025 पूर्वी दिली महत्त्वाची जबाबदारी
शिवम दुबे ठरणार गेमचेंजर? प्लेइंग इलेव्हनमध्ये आणण्यासाठी टीम इंडिया घेऊ शकते मोठा निर्णय!टीम इंडियाच्या हेड कोचच्या शर्यतीत सौरव गांगुलीची एंट्री, स्वत:चंच नाव केलं पुढे