मुंबई इंडियन्स संघाचा धडाकेबाज अष्टपैलू खेळाडू कृणाल पांड्याला गुरुवारी (१२ नोव्हेंबर) मुंबई विमानतळावर डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. त्यावर डीआरआयने कृणाल पंड्याबाबत मोठी माहिती सांगितली आहे.
डीआरआयने सांगितले की, कृणाल पांड्याकडून महागडी घड्याळे मिळाली होती. अशामध्ये प्रकरण कस्टम विभागाकडे सोपवण्यात आले होते.
कस्टम विभागाला कृणाल पांड्याकडे ओमेगा आणि ऍम्बुलर पिगेटची लाखो रुपयांची चार मौल्यवान घड्याळे मिळाली. त्यांनी पांड्याकडून कोणतेही सीमा शुल्क घेतले नव्हते. पंड्याकडे असणारी घड्याळे जप्त करण्यात आली आहेत. सोबतच कस्टम विभागाकडे मूल्यांकनासाठी सोपवण्यात आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पांड्याला जवळपास मध्यरात्री सोडले.
घड्याळांचे मूल्यांकन पूर्ण झाल्यानंतर पांड्याला कस्टम ड्यूटी म्हणून त्याच्या मूल्यातील सुमारे ३८ टक्के किंमत मोजावी लागेल. पांड्याविरुद्ध लावण्यात आलेल्या दंडाच्या रक्कमेबाबत पुढील निर्णय प्राधिकरण घेईल. पांड्याने सीमा शुल्क आणि दंडाची रक्कम दिली, तर जप्त केलेली त्याची मौल्यवान घड्याळे त्याला पुन्हा सोपवण्यात येतील.
कृणाल पांड्याशी गुरुवारी (१२ नोव्हेंबर) मुंबई विमानतळावर सायंकाळी ५ वाजता चौकसी सुरू केली होती. आणि प्रवासाच्या नियमानुसार त्याने अधिक सोनं बाळगल्याने त्याच्यावर दंडही आकारण्यात आला. सूत्रांनुसार, युएईमध्ये आयपीएलदरम्यान पांड्याने एक सोन्याची चैन विकत घेतली होती. जी भारतीय कायद्यानुसार अधिक प्रमाणात होती. पांड्याने यासाठी माफी मागितली आणि सांगितले की, इथून पुढे तो ही चूक करणार नाही. यानंतर डीआरआयने त्याला जाण्याची परवानगी दिली.
पांड्या मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. त्याने आयपीएल आयपीएल २०२० च्या या हंगामात १६ सामने खेळले. हे सामने खेळताना त्याने केवळ ६ विकेट्स घेतले. याव्यतिरिक्त त्याने फलंदाजी करताना १०९ धावाही केल्या. यासोबतच त्याने आपल्या संघाला पाचव्यांदा आयपीएलचे विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले.
महत्त्वाच्या बातम्या-
-मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू कृणाल पांड्याला मुंबई विमानतळावर घेतलं ताब्यात
-…म्हणून रोहित शर्मा आणि नोव्हेंबर महिन्याचे नाते खासच!
-रिकामी मैदाने असूनही आयपीएल २०२० ठरला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी हंगाम