पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 3 टी20 आणि 3 कसोटी सामन्यांच्या मालिका होणार आहेत. 15 सप्टेंबरपासून टी20 मालिकेने या दौऱ्याला सुरुवात होईल.
या टी20 मालिकेसाठी बीसीसीआयने आज(29ऑगस्ट) भारतीय संघाची निवड केली आहे. ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडीज विरुद्ध खेळलेला संघच जवळजवळ कायम करण्यात आला आहे. फक्त या संघात भुवनेश्वर कुमार ऐवजी हार्दिक पंड्याचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. हार्दिकला वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी विश्रांती दिली होती.
तसेच दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीची भारतीय संघात निवड करण्यात आलेली नाही. यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंतलाच पसंती मिळाली आहे.
या संघात नवदीप सैनी, दिपक चाहर आणि खलील अहमद हे वेगवान गोलंदाज असतील. तर राहुल चाहर, कृणाल पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकी गोलंदाज असतील. त्याचबरोबर हार्दिक आणि रविंद्र जडेजा हे अष्टपैलू क्रिकेटपटू संघात आहेत.
याबरोबरच संघाचे नेतृत्व विराट कोहली करेल. तर उपकर्णधारपद रोहित शर्मा सांभाळेल. त्याचबरोबर श्रेयस अय्यर, मनिष पांडे, शिखर धवन या फलंदाजांनाही या संघात संधी मिळाली आहे.
टी20 मालिकेतील पहिला सामना 15 सप्टेंबरला धरमशाला येथे, दुसरा आणि तिसरा टी20 सामना अनुक्रमे 18 आणि 22 सप्टेंबरला मोहाली आणि बंगळूरु येथे होणार आहे.
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या टी20 मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कृणाल पंड्या, वॉशिंग्टन सुंदर, राहुल चाहर, खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी
India’s squad for 3 T20Is against South Africa: Virat(Capt), Rohit (vc), KL Rahul, Shikhar Dhawan, Shreyas, Manish Pandey, Rishabh Pant (WK), Hardik Pandya, Ravindra Jadeja, Krunal Pandya, Washington Sundar, Rahul Chahar, Khaleel Ahmed, Deepak Chahar, Navdeep Saini#INDvSA
— BCCI (@BCCI) August 29, 2019
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–काय सांगता !! प्रो कबड्डीत पहिल्यांदाच एकाच संघात ५ शतकवीर
–स्टिव्ह स्मिथ म्हणला, आर्चरने डोक्याला चेंडू मारला पण मला आऊट केले नाही…