भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाला या दौऱ्यावर ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेला १३ जुलैपासून प्रारंभ होणार होता. परंतु श्रीलंकन संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने ही मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना सराव करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळाला आहे. यादरम्यान वेळेचा सदुपयोग करत भारतीय खेळाडू जोरदार सराव करत असल्याचा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे.
खेळाडू करताय कसून सराव
बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय संघातील युवा शिलेदार मैदानात घाम गाळताना दिसून येत आहेत. यामधे देवदत्त पडिक्कल, पृथ्वी शॉ, ईशान किशन, शिखर धवन आणि ऋतुराज गायकवाड हे मोठमोठे फटके मारताना दिसून येत आहेत. तसेच उपकर्णधार भुवनेश्वर कुमार, राहुल चाहर, चेतन सकारिया, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव हे गोलंदाजी करताना दिसून येत आहेत.
या व्हिडिओला त्यांनी कॅप्शन देत, “सराव आणि आणखी सराव..गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण… भारतीय संघ सज्ज होत आहे…”
Prep & More Prep ????????
Batting ????
Bowling ????
Fielding ⚡️#TeamIndia in the groove for the Sri Lanka series ???? ???? #SLvIND pic.twitter.com/JBoyrlx8l1— BCCI (@BCCI) July 12, 2021
वरिष्ठ संघ इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तर श्रीलंका दौऱ्यावर युवा खेळाडूंचा संघ रवाना करण्यात आला आहे. या संघाचे कर्णधारपद शिखर धवनकडे देण्यात आले आहे. तर भुवनेश्वर कुमारकडे संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. या दौऱ्यावर माजी भारतीय फलंदाज राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकाची भूमिका देण्यात आली आहे. लवकरच भारतीय संघातील युवा शिलेदार देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड आणि चेतन सकारिया हे भारतीय संघाला विजय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरु शकतात. (Team india in the groove for the srilanka series watch video)
असे आहे भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक
वनडे मालिका
१)पहिला वनडे सामना – १८ जुलै
२)दुसरा वनडे सामना – २० जुलै
३) तिसरा वनडे सामना – २३ जुलै
टी-२० मालिका
१) पहिला टी – २०सामना – २५ जुलै
२) दुसरा टी-२० सामना – २७ जुलै
३) तिसरा टी -२० सामना – २९ जुलै
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, रुतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, युजवेंद्र चहल, राहुल चाहर, कृष्णप्पा गौतम, क्रुणाल पंड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारिया.
नेट गोलंदाज :
ईशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंग, साई किशोर, सिमरनजीत सिंग
महत्वाच्या बातम्या –
‘आयसीसी ट्रॉफी दूरच, विराटने अजून आयपीएलसुद्धा नाही जिंकली,’ माजी सहकाऱ्याचे मोठे वक्तव्य
पाकिस्तानने लढवली शक्कल, विश्वचषक आयोजनासाठी ‘या’ दोन देशांशी मिळवला हात
सहा महिन्यांची झाली वामिका, डॅडी विराटच्या कुशीत दिसली खेळताना; अनुष्काने दाखवली झलक