ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्ट मॅचसाठी टीम इंडिया आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल करेल. असा विश्वास भारताचा महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी व्यक्त केला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा कसोटी सामना 6 ते 10 डिसेंबर दरम्यान ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 पासून खेळवला जाईल. पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. भारताला शनिवारपासून (30 नोव्हेंबर) कॅनबेरा येथील मनुका ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय दिवस-रात्र सराव सामना खेळायचा आहे.
कॅनबेरामध्ये गुलाबी चेंडूने खेळला जाणारा सराव सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट कसोटीपूर्वी हा एकमेव सराव सामना असेल. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर कर्णधार रोहित शर्माचा हा पहिलाच सामना असेल, कारण मुलाच्या जन्मामुळे तो पर्थमध्ये पहिली कसोटी खेळू शकला नाही. सुनील गावसकर मडियाशी बोलताना म्हणाले, ‘मला वाटते भारतात दोन बदल नक्कीच होतील. रोहित शर्मा आणि शुबमन गिल हे दोघेही प्लेइंग इलेव्हनमध्ये परत येतील.’
ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टमध्ये रोहित शर्मा आणि शुबमन गिल प्लेइंग इलेव्हनमध्ये आले तर देवदत्त पडिक्कल आणि ध्रुव जुरेलला बाहेर बसावं लागेल. याशिवाय सर्वांच्या नजरा केएल राहुलच्या फलंदाजीवर असेल. सुनील गावस्कर म्हणाले, ‘मला वाटते की फलंदाजी क्रमवारीत बदल होईल, जेथे रोहित शर्मा केएल राहुलची जागा घेईल, शुबमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल, पडिक्कल आणि जुरेल संघाबाहेर असतील, तर राहुल सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल. ‘
ॲडलेडमध्ये होणाऱ्या डे-नाईट टेस्टसाठी फिरकी विभागात काही बदल दिसू शकतात. भारताने शेवटच्या वेळी 2020 मध्ये ॲडलेडमध्ये दिवस-रात्र कसोटी खेळली होती. त्या सामन्यात अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 45 धावांत 4 बळी घेतले होते. या दरम्यान रविचंद्रन अश्विनने स्टीव्ह स्मिथलाही बाद केले होते. मात्र, सुनील गावसकर यांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी आहे. सुनील गावस्कर म्हणाले, ‘आणि आणखी एक बदल घडू शकतो तो म्हणजे वॉशिंग्टन सुंदरच्या जागी रवींद्र जडेजाला आणावे.’ कारण, गुलाबी चेंडूच्या कसोटीत फलंदाजी महत्त्वाची ठरते आणि फिरकीपटूंचा सहसा वापर केला जात नाही.
हेही वाचा-
टीम इंडियाची ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांशी भेट, रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भाषण!
IND VS AUS; दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात स्टार खेळाडूची एंन्ट्री! मधली फळी आणखी बळकट
चॅम्पियन्स ट्रॉफी प्रकरणी आयसीसीकडे 3 पर्याय, पाकिस्तान बीसीसीआयपुढे झुकणार का?