भारतीय संघाने पाकिस्तानला एका थरारक सामन्यात हरवतं टी20 विश्वचषकाची धमाकेदार सुरूवात केली. त्यामुळे भारताला गुणतालिकेत 2 अंक प्राप्त झाले आहेत. भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य पहिला टप्पा पार करत उपांत्यफेरीत स्थान प्राप्त करणे हे आहे, यासाठी भारतीय संघाकडे योजनाही असतील.
भारताला यापुढील 4 सामन्यांपैकी किमान 3 सामन्यांमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे. हे 3 सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ उपांत्यफेरीत खेळताना दिसेल. जर भारतीय संघ नेदरलंड, बांग्लादेश आणि झिम्बाब्वे या संघांना हरवण्यात यशस्वी झाला, तर भारताचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होईल. भारतीय संघाचा एक सामना दक्षिण अफ्रिकेसोबत देखील आहे. भारतीय संघाचा सध्याचा फॉर्म पाहून असे वाटते की, ते चारही सामने जिंकू शकतात. जर चारपैकी एखाद्या सामन्यात पावसाचा व्यत्यय आलाचं तर तीन सामने जिंकून देखील भारत उपांत्य फेरीत पोहचू शकतो. सध्या गुणतालिकेत बांग्लादेश पहिल्या स्थानावर असून भारत दुसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँड्स विरूद्ध मिळालेल्या विजयानंतर बांग्लादेश ‘नेट रनरेट’ मुळे गुणतालिकेच्या शीर्षस्थानी आहे. मात्र, हा इतका महत्वाचा मुद्दा नाहीये.
दक्षिण अफ्रिका आणि झिम्बाब्वे या संघांमध्ये झालेला सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना 9 षटकांचा करण्यात आलेला. मात्र, तरीही हा सामना पूर्ण होणे शक्य झाले नाही. त्यामुळे दोन्ही संघांना 1-1 अंक विभागून देण्यात आले.
भारतीय संघाचा रनरेट सध्या अधिकमध्ये आहे. येत्या सामन्यांमध्ये विजय मिळवल्यावर तो रनरेट आणखी वाढेल. विराट कोहलीने मागच्या सामन्यात धमाकेदार प्रदर्शन केले होते. पाकिस्तान विरूद्ध 82 धावा बनवून तो नाबाद राहिला. भारतीय संघाच्या पहिल्या सामन्यामधील विजयाचं श्रेय विराट ला दिले गेलेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मार्कसने कस के मारा! पाहा 18 चेंडूवर कशी केली षटकार-चौकारांची बरसात
काय बोलायचं याला? अख्तर म्हणतोय, “आता विराटने टी20 मधून निवृत्त व्हावे”