भारतीय संघाने विश्वकसोटी स्पर्धेच्या अंतिम सामान्यपूर्वी शुक्रवारी(11 जून) कसून सराव केला. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान विश्वकसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना 18 ते 22 जून दरम्यान खेळवला जाईल. त्यामुळे या सामन्याची तयारी म्हणून भारतीय संघ आपल्याच संघातील खेळाडूंमध्ये एक सामना खेळत असून तो सामना एकूण 4 दिवसीय आहे. सध्या न्युझीलंड संघ इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळत असून त्या मालिकेचा उपयोग त्यांना नक्कीच भारताविरुद्ध फायदा होईल, असे मत अनेक क्रिकेट विश्लेषकांनी मांडले आहे.
भारताच्या सराव सामन्यात एका संघाचे नेतृत्व विराट कोहली करत असून दुसऱ्या संघाचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. या सराव सामन्याचे काही फोटो देखील समोर आले असून, त्यामध्ये विराट शुबमन गिलसोबत फलंदाजी करतांना दिसत आहे. तसेच एका फोटोत शुबमन फलंदाजी करीत असून विराट सीमारेषेवर असून आपल्या फलंदाजीची वाट बघत बसलेला दिसून येत आहे.
📸📸 Snapshots from the first session of our intra-squad match simulation here in Southampton.#TeamIndia pic.twitter.com/FjtKUghnDH
— BCCI (@BCCI) June 11, 2021
अनुभवी इशांत शर्मा केएल राहुलच्या संघात खेळत आहे. त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमीदेखील केएल राहुलच्याच नेतृत्वात खेळतोय. तसेच विराटच्या संघात शुबमन गिल आणि चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे.
Excellent setting for an intra-squad match simulation here in Southampton. #TeamIndia 😎🙌 pic.twitter.com/3DdgPp6dIj
— BCCI (@BCCI) June 11, 2021
भारतीय संघ कोणत्याही अधिकृत सराव सामान्याशिवाय कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात उतरेल. भारतीय संघ आधी मुंबईत विलगिकीरणात होता आणि नंतर इंग्लंडमध्ये गेल्यावर देखील आपला विलगिकीरण कालावधी पूर्ण करून संघाने सरावाला सुरवात केली आहे.
https://twitter.com/BCCI/status/1403570720228085763
बीसीसीआयने खेळाडूंच्या सरवादरम्यानच अजून एक विडिओ आपल्या ट्विटरवर पोस्ट केला असून त्यामध्ये कर्णधार कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा आणि रिषभ पंत सराव करताना दिसतात. याआधी विराटला नेटमध्ये सराव करताना बघितले गेले होते.
भारतीय फलंदाजांनी नेटमध्ये चेंडू कसा सोडायचा याचा अभ्यास देखील केला. कारण इंग्लंडच्या वेगवान खेळपट्टीवर फलंदाजांच्या धैर्याची परीक्षा असते, चेंडू नवा असल्याकारणाने स्विंग जास्त होतो त्यामुळे फलंदाज तो कसा सोडतो, हे महत्वपूर्ण ठरते.
महत्त्वाच्या बातम्या –
चहल करणार ‘या’ विश्वविजेत्या खेळाडूचा सामना, मात्र क्रिकेट नाही तर चक्क बुद्धिबळाच्या पटावर
Video: पाकिस्तानी गोलंदाजाचा सामना करताना आंद्रे रसल जखमी; स्ट्रेचरवरुन न्यावे लागले हॉस्पिटलमध्ये
WIvSA: क्विंटन डी कॉकचे वादळी शतक, दक्षिण आफ्रिका दुसर्या दिवसाखेर मजबूत स्थितीत