बुधवारी (15 फेब्रुवारी) आयसीसीने नवी कसोटी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय संघाला मोठा फायदा झाला असून, ऑस्ट्रेलियाला मागे टाकत रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ आता कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये अव्वलस्थान पटकावणारा भारत केवळ दुसरा संघ बनला. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने अशी कामगिरी केली होती.
भारताला नागपूर कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्याचा फायदा या क्रमवारीत मिळाला. भारताने हा सामना अवघ्या तीन दिवसात एक डाव आणि 132 धावांनी आपल्या नावे केला होता. भारतीय संघाचे आता 116 रेटिंग गुण झाले असून दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या नावे 111 रेटिंग गुण आहेत. त्याचबरोबर इंग्लंड अव्वल तीनमध्ये असणारा तिसरा संघ आहे.
Star performers from the Nagpur and Bulawayo Tests make significant gains in the latest @MRFWorldwide ICC Men’s Test Player Rankings 📈
Details 👇https://t.co/QRn72RdBtd
— ICC (@ICC) February 15, 2023
भारतीय संघ यापूर्वी 2018 मध्ये अखेरच्या वेळी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला होता. भारतीय संघ मागील जवळपास वर्षभरापासून टी20 क्रमवारीत पहिल्या स्थानी आहे. तर, नुकतेच न्यूझीलंडला मागे टाकून भारताने वनडे क्रमवारीतही पहिले स्थान पटकावले होते. त्यानंतर आता कसोटी क्रमवारीत ही पहिले स्थान मिळवण्यात भारतीय संघाला यश आले आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेने एकाच वेळी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये पहिल्या स्थानी पोहोचण्याचा कारनामा केला होता. दक्षिण आफ्रिकेने 2011 मध्ये ही कामगिरी केली होती.
सांगीत कामगिरीनंतर भारताच्या खेळाडूंनी वैयक्तिकरित्या देखील उत्कृष्ट कामगिरी केली. या सामन्यात आठ बळी मिळवणारा भारताचा प्रमुख फिरकीपटू रविचंद्र अश्विन गोलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. तर अक्षर पटेल हा अष्टपैलूंच्या क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम सातव्या स्थानी आला आहे.
(Team India Reach Top Spot In All Three Format In ICC Rankings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘कोहली खोटं बोलला, 9 लोक साक्षीला आहेत’, विराट-गांगुली वादावर चेतन शर्मांचा मोठा दावा
‘आम्ही पाच जण संपूर्ण भारताचे क्रिकेट चालवतो’, स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मांची बडी बात