कोरोना व्हायरसच्या संकटाचा अन्य क्षेत्रांप्रमाणेच क्रीडा क्षेत्रालाही सामना करावा लागला. अनेक स्पर्धा यावर्षी रद्द झाल्या. क्रिकेटही जवळपास 5 महिने बंद होते. कोरोनाचे संकट ओढावण्याआधी भारतीय क्रिकेट संघ यावर्षी केवळ न्यूझीलंड दौरा करु शकला. त्यानंतर भारतीय क्रिकेटपटू थेट आयपीएल खेळण्यासाठी उतरले होते. त्यानंतर आता सध्या भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. आता मात्र यानंतर 2021 च्या अखेरीसपर्यंत भारतीय संघ सातत्याने क्रिकेट मालिका खेळताना दिसणार आहे.
इनसाईड स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय क्रिकेट संघ 2021 मध्ये 14 कसोटी, 16 वनडे आणि 23 टी20 सामने खेळणार आहे. याशिवाय आयपीएल, आशिया चषक आणि टी20 विश्वचषक या स्पर्धाही या वर्षात होणार आहेत. असे असले तरी याबाबत अजून बीसीसीआयने अधिकृतरित्या कोणतेही भाष्य केलेले नाही.
जानेवारी-मार्चदरम्यान इंग्लंड येणार भारत दौऱ्यावर –
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरुन परतल्यानंतर इंग्लंडविरुद्ध मायदेशात तिन्ही क्रिकेट प्रकारच्या मालिका खेळणार आहे. यात 4 कसोटी, 4 वनडे आणि 4 टी20 सामन्यांचा समावेश असेल.
या मालिकांनंतर आयपीएलच्या 14 व्या हंगामाला सुरुवात होईल. तसेच नंतर भारतीय संघ जूनमध्ये श्रीलंका दौऱ्यावर जाईल. तिथे 3 वनडे आणि 5 टी20 सामन्यांच्या मालिका होतील. त्यानंतर लगेचच श्रीलंकेतच आशिया चषक स्पर्धा होईल.
जूलैनंतर परदेश दौरे –
जूलैमध्ये भारतीय क्रिकेट संघ 3 वनडे सामन्यांसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर जाईल. त्यानंतर जूलैच्या अखेरीस भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाईल. तिथे सप्टेंबरपर्यंत 5 कसोटी सामन्यांची मालिका होईल.
वर्षअखेरीस मायदेशात सामने, विश्वचषकाचेही आयोजन –
ऑक्टोबरमध्ये दक्षिण आफ्रिका संघ 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येईल. यानंतर लगेचच भारतात टी20 विश्वचषक होणार आहे. हा विश्वचषक ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणार आहे.
टी20 विश्वचषकानंतर नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येईल. त्यांना भारताविरुद्ध 2 कसोटी आणि 3 टी20 सामने खेळायचे आहेत.
डिसेंबरमध्ये भारतीय संघ 3 कसोटी आणि 3 टी20 सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाईल.
2022 वर्षही असेल व्यस्त –
2021 वर्षाप्रमाणेच 2022 वर्षही व्यस्त असेल. या वर्षातही भारतीय संघाला आशिया चषक, टी20 विश्वचषक खेळायचा आहे. तसेच वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, श्रीलंका, इंग्लंड, बांगलादेश या संघांविरुद्धही मालिका खेळायच्या आहेत.
2023 मध्ये भारतात होणार वनडे विश्वचषक –
2023 मध्ये भारतात वनडे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. त्याआधी भारतीय संघ न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया विरुद्ध मालिका खेळायच्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
चेन्नईने एमएस धोनीला संघातून रिलीझ करावे, माजी क्रिकेटपटूचे मोठे भाष्य
‘मुंबई इंडियन्स टी२० वर्ल्ड कपही जिंकेल,’ माजी दिग्गजाच्या ‘या’ वक्तव्यावर आकाश अंबानीची भन्नाट प्रतिक्रिया“
श्रेयस अय्यरमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची क्षमता”, ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने केले कौतुक
ट्रेंडिंग लेख –
अन् बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनी क्रिकेट स्टेडियममध्ये साप सोडण्याचा प्लॅन केला होता…
आठवणीतील १९८७ विश्वचषक : मार्टिन क्रो यांच्या ‘त्या’ झेलाने सामन्याचा नूर पालटला