मुंबई । भारताचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी 1987 साली विश्वचषकात हॅट्ट्रीक घेण्याचा घेण्याचा कारनामा केला होता. या बहारदार कामगिरीमुळे ते अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले. पण या कामगिरी आधी त्यांच्याकडून अशी चूक झाली की, भारतीय क्रिकेट फॅन्स तो क्षण विसरू शकत नाहीत. 1986 साली ऑस्ट्रेल-एशिया कप च्या अंतिम सामन्यात जावेद मियांदाद यांनी चेतन शर्मा यांच्या शेवटच्या फुलटॉस चेंडूवर फटका मारत पाकिस्तानला विजय मिळवून दिला.
हा पराभव भारतीय संघाच्या इतका जिव्हारी लागला की, तो क्षण आजही विसरू शकत नाही. या पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधील वातावरण कसे होते? याचा खुलासा चेतन शर्मा यांनी एका संकेतस्थळाशी बोलताना केला.
शर्मा म्हणाले, “त्या षटकापूर्वी मी चांगली गोलंदाजी केली होती. त्यामुळे कपिल यांनी माझ्यावर विश्वास दाखवत शेवटचे षटक टाकण्यास मला बोलावले. त्यावेळी माझे वय अवघे 20 वर्षे होते.
तो दिवस आमच्यासाठी खराब होता. अझहरुद्दीन कडून धावबाद करण्याची संधीदेखील हुकली. मी माझ्याकडून चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला, पण दबावाखाली खेळताना माझ्याकडून तो चेंडू फुलटॉस पडला. माझा संघ खूपच ‘सपोर्टिव’ होता. सामना संपल्यानंतर एकाही वरिष्ठ खेळाडूंनी मला काहीच बोलले नाही. त्यानंतर मी चांगली कामगिरी करत गेलो.”
चेतन शर्मा भारतीय गोलंदाजांच्या ताफ्या विषयी बोलताना म्हणाले की, “मला जसप्रीत बुमरा हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज वाटतो. त्याची गोलंदाजी शैली अजब करणारी आहे. पण त्याला खेळणे फार मुश्किल आहे. शमी, भुवी, इशांत हे वेगळय़ा प्रकारचा गोलंदाज आहे, पण मी बुमराला पसंद करतो. शमीकडे जी सीम पोझिशन आहे, ती कुणाकडे नाही. या सर्वापैकी बुमराह वेगळ्याच प्रकारचा गोलंदाज आहे.”
#OnThisDay in 1986, Javed Miandad hit the famous last-ball six to Chetan Sharma (India) in Sharjah to win the Australasia Cup for Pakistan pic.twitter.com/OcE4acmOUp
— Irshad Ali (@irshadaajnews) April 18, 2017
चेतन शर्मा यांनी सध्याचे फॅब-4 विषयी बोलताना म्हणाले की, “विराट कोहली, केन विल्यम्सन, स्टीव स्मिथ आणि रोहित शर्मा हे टॉप चार फलंदाज आहेत. विराट कोहली हा सर्वोत्कृष्ट फलंदाज आहे. भारतीय संघाची फलंदाजी इतर संघापेक्षा खूपच मजबूत असल्याचे त्यांनी नमूद केले.”