---Advertisement---

ट्रेनिंग कॅम्पच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियासाठी गुड न्यूज, वाचा काय-काय घडलं

---Advertisement---

आशिया चषक 2023 स्पर्धेकडे आशिया खंडासोबतच जगभरातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. या स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. स्पर्धेपूर्वी संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. त्यासाठी भारतीय संघाचे बंगळुरूच्या अलूर येथे विशेष शिबिर आयोजित केले गेले आहे. शिबिराच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय संघ कसून सराव करताना दिसून आला

आशिया चषकासाठी श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे हे शिबिर आयोजित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. पहिल्या दिवसाच्या सराव सत्रात भारतीय खेळाडूंनी तब्बल सहा तास सराव केला होता. दुसऱ्या दिवशी देखील भारतीय संघाने अत्यंत तन्मयतेने सरावाला प्राधान्य दिले.

सराव शिबिराच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार रोहित शर्मा याने वेगवान गोलंदाजांचा सामना केला. विशेष करून डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध तो अत्यंत सहजतेने फलंदाजी करताना दिसला. तर अनुभवी विराट कोहली याने सलग दुसऱ्या दिवशी फिरकी गोलंदाजांचा सामना केला. दुसऱ्या दिवशीच्या सरावात विराट काहीसा आक्रमक फलंदाजी करताना दिसला.

या व्यतिरिक्त पहिल्या दिवशी प्रमाणे दुसऱ्या दिवशी देखील भारतीय फलंदाजांनी जोडीने सराव करण्याला प्राधान्य दिले. दुसऱ्या दिवशीचे वैशिष्ट्य म्हणजे केएल राहुल याने यष्टीरक्षणाला सुरुवात केली.

यावेळी आशिया चषक पाकिस्तान व श्रीलंका या दोन देशात होणार आहे. मात्र, भारतीय संघ आपले सर्व सामने श्रीलंकेत खेळेल. भारतीय संघाचा अ गटात पाकिस्तान व नेपाळ यांच्यासह समावेश आहे. भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान 2 सप्टेंबर रोजी सामना खेळला जाईल. त्यानंतर सुपर फोर फेरी होईल. स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.

(Team India Training Camp Ahead Asia Cup In Alur Day 2 Virat Rohit Practice Rahul Starts Wicketkeeping)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---