भारतीय संघ आपल्या टी20 विश्वचषक मोहिमेला आज (5जून) पासून सुरुवात करणार आहे. टीम इंडीयाचा पहिला सामना आयर्लंडशी होणार आहे. आयर्लंड संघ भलेही खिताबासाठी दावेदार नसली तरी भारतीय संघ त्यांना हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. अमेरिकेत खेळल्या जाणाऱ्या टी20 विश्वचषकाची परिस्थिती, हवामान आणि खेळपट्टी आधीच आव्हानात्मक आहे. अश्या परिस्थितीत टीम इंडीया संपूर्ण ताकतीने मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे
टीम इंडीयाला अमेरिकेत खेळण्याचा जास्त अनुभव नाही. आतापर्यंत अमेरिका येथे टीम इंडीयाचे जास्त सामने झाले नाहीत, त्यामध्ये खेळपट्टी फलंदाजांना अव्हानात्मक राहिली आहे. आता या परिस्थितीत भारतीय संघ फलंदाजीवर जास्त भर देऊ शकतो. खासकरुन मधल्या- खालच्या फळीला मजबूती देण्याचा प्रयत्न करु शकतो. ज्यासाठी शिवम दुबेला संघात स्थान देण्याची चर्चा होत आहे.
शिवम दुबेचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यासाठी भारताला खूप कठोर निर्णय घ्यावा लागेल. यासाठी भारतीय कर्णधार रोहित शर्माला त्याची नियमित सलामीची जोडीदार यशस्वी जयस्वालला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करावे लागू शकते.
यशस्वी जयस्वालच्या जागी विराट कोहलीला सलामी दिली जाऊ शकते. याचा अर्थ असाही होईल की पॉवरप्लेमध्ये वेगवान फलंदाजीची जबाबदारी पूर्णपणे रोहितवर पडेल कारण विराटला अनेकदा एक बाजू सांभाळून लांब डाव खेळायला आवडते.
आयर्लंडविरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी भारतीय खेळाडूंनी जोरदार सराव करताना पहायला मिळाले. फलंदाजांनी उत्कृष्ट फटकेबाजी केली.
Ready to go 👊🇮🇳
India players in good touch in the nets ahead of their opening #T20WorldCup match against Ireland 🙌 pic.twitter.com/NOwsv2z6yj
— ICC (@ICC) June 4, 2024
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार ), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सैमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पांड्या (उपकर्णधार) रवींद्र जडेजा,अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज,आर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल
महत्तवाच्या बातम्या-
वर्ल्डकप विजेत्या माजी क्रिकेटपटूचा लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय, तिसऱ्यांदा बनले खासदार
युरोपियन देशांविरुद्ध एकही टी20 सामना जिंकू शकले नाही! साहेबांच्या नावे लज्जास्पद विक्रम कायम
पावसामुळे वाहून जाईल भारत विरुद्ध आयर्लंड सामना? आज न्यूयॉर्कमधील हवामान कसं असेल? सर्वकाही जाणून घ्या