भारतीय क्रिकेट संघात प्रतिभावान खेळाडू यशस्वी जयस्वालने त्याच्या कसोटी कारकिर्दीबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने वाटते की त्याच्या कसोटी कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याची आशा कर्णधार रोहित शर्माच्या फलंदाजीवर आहे. जयस्वाल म्हणाला, रोहितसोबत फलंदाजी करताना मला खूप काही शिकायला मिळते.
जयस्वालने गेल्या वर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पण केले होते. त्याने रोहितसोबत नऊ कसोटी सामने खेळले आहेत. रोहित आणि जयस्वाल यांनी टॉप ऑर्डरमध्ये चांगली कामगिरी केली आहे. दोघांनी अनेक चांगल्या भागीदारी केल्या आहेत.
दुलीप ट्राॅफीला आज 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. दरम्यान पूर्वसंध्येला बोलताना तो म्हणाला, ‘जेव्हा मी त्याच्यासोबत (रोहित) फलंदाजीला जातो तो एक अविश्वसनीय अनुभव असतो. तो त्याचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतो. मला असे वाटते की तो ज्या पद्धतीने खेळावर नियंत्रण ठेवतो आणि विकेट समजून घेतो तो पूर्णपणे स्पॉट आहे आणि त्याच्याकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे. तुम्ही त्याच्याकडून वेगवान गोलंदाजी किंवा फिरकीला अनुकूल विकेट्सनुसार तुमची फलंदाजी बदलणे किंवा एक किंवा दोन विकेट पडल्यावर तुमची फलंदाजी बदलणे यासारख्या गोष्टी शिकू शकता.’
अव्वल दर्जाच्या क्रिकेटमध्ये एक वर्ष पूर्ण करणाऱ्या जयस्वालने सांगितले की, गेल्या 12 महिन्यांत तो त्याच्या खेळाबाबत तो अधिक जागरूक झाला आहे. तसेच तो म्हणाल, ‘आता मी बरीच परिस्थिती पाहू शकतो आणि संघासाठी माझा खेळ बदलू शकतो आणि परिस्थिती सांभाळू शकतो. मला वाटते की गेल्या वर्षभरात हे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. जेव्हा मी देशांतर्गत क्रिकेट खेळत होतो तेव्हा मला अनेक गोष्टींची माहिती नव्हती, परंतु जेव्हापासून मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायला सुरुवात केली, तेव्हापासून माझी संवादाची आणि खेळाची वाचनाची समज खूप सुधारली आहे. मला फक्त शिकत राहायचं आहे.’
या 22 वर्षीय खेळाडूने सांगितले की, नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देतात. त्यामुळे खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ दाखवण्यास मदत होते, असे ते म्हणाले. पुढे तो जयस्वाल म्हणाला “हो, मी श्रीलंका मालिकेदरम्यान त्याच्याशी बोललो होतो. त्याने खरोखरच आम्हाला पाठिंबा दिला आणि म्हणाला, फक्त मैदानावर जा आणि मुक्तपणे खेळा आणि खेळाचा आनंद घ्या आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत. यामुळे आम्हाला खूप आत्मविश्वास मिळतो आणि आम्हाला निर्भयपणे खेळण्यास मदत होते.
हेही वाचा-
काय सांगता! संपूर्ण संघ 10 रन्सवर ऑलआऊट, अवघ्या 5 चेंडूत संपला सामना!
दुलीप ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरची फ्लॉप कामगिरी कायम, बांग्लादेश कसोटी मालिकेतून बाहेर?
आंतरराष्ट्रीय टी 20 सामन्याच्या पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक धावा करणारे टाॅप-5 फलंदाज