गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेली विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटन येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड असा रंगणार आहे. शुक्रवार(१८ जून)पासून या सामन्याची सुरुवात होणार होती. परंतु, खेळाडूंपुर्वी पावसाने मैदानावर हजेरी न लावण्याने या सामन्याच्या उत्साहावर पाणी फेरले. मात्र पावसामुळे मिळालेल्या फावल्या वेळेचा भारतीय खेळाडूंची चांगलाच फायदा घेतला. हे या रिकाम्या वेळेत काय करत होते? याचा व्हिडीओ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआय)ने त्यांचा ट्विटर हॅन्डलवरून शेअर केले.
शुक्रवार रोजी साउथम्पटनमध्ये दिवसभर पावसाची रिमझिम चालू होती. तत्पुर्वी रात्रीही मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे सुरुवातीला कसोटी अजिंक्यपद अंतिम सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र रद्द करण्यात आले असल्याचे सांगितले गेले. बीसीसीआयने सोशल मीडियाद्वारे यासंदर्भात माहिती दिली होती. त्यानंतर पुढे लंच ब्रेकनंतर खेळाला सुरुवात होईल अशी अपेक्षा होती. परंतु मैदानावर साचलेले पाणी आणि पुन्हा पडू लागलेल्या पावसांच्या सरी, यामुळे नाइलाजास्तव पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला.
दरम्यान, विरंगुळा म्हणून भारतीय संघाचे खेळाडू आणि व्यवस्थापन गटातले काही कर्मचारी एक खेळताना दिसले. बीसीसीआयने ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘साउथम्पटनमध्ये पाऊस पडत असल्याने भारतीय संघाचे खेळाडू आणि व्यवस्थापन गटातले कर्मचारी ‘डार्ट’ खेळ खेळत आहेत.’
भारतीय फिरकीपटू आर अश्विन आपल्या इतर सहकाऱ्याांसोबत डार्ट खेळ खेळताना दिसत आहे. अश्विनने या खेळत ६० गुण सुद्धा प्राप्त केले आहेत.
When rain didn't stop play ????#TeamIndia members enjoyed a game of dart on the sidelines during the rain break in Southampton ????#WTC21 Final pic.twitter.com/nirjCfzjMM
— BCCI (@BCCI) June 18, 2021
आता सर्व क्रिकेटप्रेमी साउथम्पटनच्या हवामानावर लक्ष ठेऊन आहेत. शनिवार रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता सामना सुरु होईल. अशात आजही पाऊस या ऐतिहासिक सामन्यात खोडा घालेल का? याची चिंता सर्वांना सतावत आहे..