आयपीएलच्या १४ व्या हंगामातील दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात रिषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्स संघाने धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज संघावर ७ गडी राखून मोठा विजय मिळवला आहे. या विजयासोबतच दिल्ली कॅपिटल्स संघाने चेन्नईला नवव्यांदा पराभूत करण्याचा पराक्रम केला.
त्यामुळे दिल्लीने चेन्नई सुपर किंग्जला सर्वाधिकवेळा पराभूत करणाऱ्या संघांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली आहे. दिल्लीसह या यादीत दुसऱ्या क्रमांकावर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, पंजाब किंग्स आणि राजस्थान रॉयल्स आहेत. त्यांनी देखील प्रत्येकी ९ वेळा चेन्नईला पराभूत केले आहे. तसेच चेन्नईला सर्वाधिकवेळा पराभूत करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर आहे. मुंबईने आत्तापर्यंत चेन्नईला १८ वेळा पराभूत केले आहे.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. या आमंत्रणाचा स्वीकार करत चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८८ धावांचा डोंगर उभा केला होता. त्यांनतर दुसऱ्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने हे आव्हान सहजरित्या पूर्ण करत चेन्नई सुपर किंग्ज संघाला पराभूत केले आहे.चेन्नई सुपर किंग्ज संघाने दिलेल्या १८९ धावांचे आव्हान दिल्ली संघाने ३ गडी आणि ८ चेंडू राखून पूर्ण केले.
चेन्नई सुपर किंग्ज संघाला सर्वाधिक वेळेस पराभूत करणारे संघ
मुंबई इंडियन्स : १८ वेळेस
दिल्ली कॅपिटल्स : ९ वेळेस
पंजाब किंग्स : ९ वेळेस
राजस्थान रॉयल्स : ९ वेळेस
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर : ९ वेळेस
महत्त्वाच्या बातम्या –
फाफ डू प्लेसिसला शुन्यावर बाद करणारा आवेश खास चौथाच गोलंदाज, पाहा कोण आहेत अन्य तीन गोलंदाज
कहर! धोनी थोडेथोडके नाही तब्बल ६ वर्षे आणि १०८ डावानंतर झालाय शुन्यावर बाद, वाचा ही आकडेवारी
मोहम्मद हाफिजचा मोठा विक्रम! रोहित, गप्टिल यांचा समावेश असलेल्या ‘या’ खास यादीत झाला समावेश