प्रो कबड्डी लीग २०२१ ला काही दिवसांपूर्वी धमाक्यात सुरुवात झाली आहे. प्रो कबड्डीचा यंदाचा हा ८ वा हंगाम आहे. हंगामाच्या पाचव्या आठवड्यात बुधवार रोजीचा (१९जानेवारी) दुसरा सामना जयपूर पिंक पँथर्स आणि तेलुगू टायटन्स संघात झाला.
या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये जयपूर संघ २०-१३ ने आघाडीवर होता. परंतु पुढे तेलुगू टायटन्सनी सामन्यात दमदार पुनरागमन करत ३५-३४ च्या फरकाने सामना खिशात घातला आहे. हा त्यांचा यंदाच्या हंगामातील पहिलाच विजय होता.
.@Telugu_Titans ki season ki pehli jeet ????
Let's just leave it at that!#JPPvTT #SuperhitPanga pic.twitter.com/XcPjIlqV1X
— ProKabaddi (@ProKabaddi) January 19, 2022
हरियाणापुढे पुणेरी पलटण पस्त!
तत्पूर्वी हरियाणा स्टिलर्स आणि पुणेरी पलटण या संघात सामना झाला. हरियाणा संघाने ७ गुणांच्या फरकाने हा सामना खिशात घातला आहे. हरियाणा आणि पुणे संघातील सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये उभय संघ १४-१४ ने बरोबरीत होते. परंतु पुढे हरियाणाच्या कबड्डीपटूंनी जबरदस्त खेळ दाखवत सामन्यात आघाडी घेतली. शेवटपर्यंत ही आघाडी कायम राखत त्यांनी ३७-३० च्या फरकाने पुणे संघाला धोबीपछाड दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
हरियाणा स्टिलर्सची पुणेरी पलटणला करारी शिकस्त, धाकधूकीच्या सामन्यात ७ गुणांनी मारली बाजी
भारतीय गोलंदाजांची पिसं काढत दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचं खणखणीत शतक, केला ‘हा’ खास पराक्रम
किंग कोहली इज बॅक..! सचिनचा ‘हा’ कुणी मोडेल असं वाटलंही नव्हतं पण विराटने आज मोडलाच
हेही पाहा-