दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. टेंबा बवुमा याने टी20 कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, आता तो वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व करेल. कसोटी संघाचा कर्णधार डीन एल्गर याने देखील कसोटी नेतृत्वाचा राजीनामा दिला आहे.
Introducing the new #Proteas Test captain – Temba Bavuma 💪
He remains captain of the ODI side while he has opted to relinquish the captaincy of the T20I side. #BePartOfIt pic.twitter.com/WgsbHhEgss
— Proteas Men (@ProteasMenCSA) February 17, 2023
वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नुकताच दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर केला गेला. डीन एल्गर याच्याकडून नेतृत्व करून घेत कसोटी संघाचे नेतृत्व टेंबा बवुमा याच्याकडे देण्यात आले. मात्र, त्याच्याकडून टी20 संघाचे नेतृत्व काढून घेण्यात आल्याचे देखील जाहीर केले गेले. त्यामुळे आता बवुमा वनडे व कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. टी20 नेतृत्व ऐडन मार्करम याच्याकडे देण्यात येऊ शकते.
बवुमा मागील दोन वर्षापासून दक्षिण आफ्रिका टी20 संघाचे नेतृत्व करत होता. मात्र, या काळात दक्षिण आफ्रिका संघाची कामगिरी खराब झाली होती. दोन विश्वचषकात दक्षिण आफ्रिका उपांत्य फेरीपर्यंत पोहोचण्याचा अपयशी ठरलेला. स्वतः बवुमाची कामगिरी देखील अतिशय खराब होती.
दक्षिण आफ्रिका संघ सलग दोन जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये डीन एल्गर याच्या नेतृत्वात सहभागी झाला होता. मात्र, या दोन्ही स्पर्धांमध्ये संघ अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. त्याच कारणाने आता बवुमा कसोटी संघाचे नेतृत्व करताना दिसेल.
(Temba Bavuma Step Down As South Africa T20 Captain Dean Elgar Resign As Test Captain)
बातमी अपडेट होत आहे…
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबादला मिळाला कर्णधार? मयंक अन् भुवी नाही, तर अश्विनने ‘या’ खेळाडूचं घेतलं नाव
BREAKING: 31 मार्चपासून उडणार आयपीएल 2023 चा धुरळा, सीएसके-गुजरातमध्ये रंगणार उद्घाटनाचा सामना