क्रीडा जगतातील प्रत्येक खेळाडू आपल्या मर्यादित वयानंतर खेळातून निवृत्ती घेत असतो. अशाच प्रकारे, भारताचा सर्वोत्तम टेनिसपटू (Tennis Player) लिएंडर पेसने ( Leander Paes) आपण निवृत्ती (Retirement) घेत असल्याचे घोषित केले आहे. 2020 चा टेनिस हंगाम हा त्याचा शेवटचा हंगाम असणार आहे. त्यानंतर तो निवृत्ती घेईल.
1996 ऑलिम्पिकमध्ये एकेरीत पदक जिंकणाऱ्या पेसने सोशल मीडियावर ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना निवृत्तीची घोषणा केली.
डेव्हिस कपच्या इतिहासात सर्वाधिक 44 विजयांसह दुहेरी टेनिसपटू म्हणून काम करणारा लिएंडर 19 वर्षात प्रथमच 100 क्रमांकाच्या यादीतून बाहेर पडला.
लिएंडरने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केलेल्या निवेदनात असे लिहिले आहे की, “टेनिसपटू म्हणून मला 2020 हे वर्ष निवृत्तीचे वर्ष म्हणून जाहीर करायचे आहे.”
“मी 2020 च्या टेनिसची वाट पहात आहे. जिथे मी काही निवडक स्पर्धा खेळणार आहे. माझ्या संघासह प्रवास करणार आहे आणि जगभरातील माझे सर्व मित्र आणि चाहते यांच्यासमवेत हे वर्ष साजरे करणार आहे,” असे लिएंडरने त्याच्या निवदनात लिहिले आहे.
“तुम्ही सर्वांनीच मला प्रेरणा दिली आहे आणि मला “धन्यवाद” म्हणायला हे वर्ष घ्यायचे आहे,” असे लिएंडरने त्याच्या निवेदनात म्हटले आहे.
“मी माझ्या पालकांना त्यांचे मार्गदर्शन, शिस्त, त्यांनी तयार केलेले वातावरण आणि माझ्यावर आयुष्यभर केलेले निस्वार्थ प्रेम याबद्दल त्यांचे आभार मानू इच्छितो. मी तुमच्या समर्थन आणि विश्वासाशिवाय कोणीही नाही, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो,” असेही लिएंडरने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
त्याचबरोबर त्याने आपल्या मुलीचे आणि मोठ्या बहिनीचे आभार मानले आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीसाठी न्यूझीलंड संघात दोन मोठे बदल
वाचा- ????https://t.co/u1MIZMwHuS????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT #BoxingDayTest— Maha Sports (@Maha_Sports) December 26, 2019
शिखर धवनचा हा व्हिडियो सोशल मिडीयावर होतोय जोरदार व्हायरल
वाचा- ????https://t.co/oikj69zXr4????#म #मराठी #Cricket #TeamIndia @Mazi_Marathi
@MarathiRT #shikhardhawan— Maha Sports (@Maha_Sports) December 26, 2019