भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दोन सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. तसेच, तिसरा कसोटी सामना इंदोर येथे खेळला जात आहे. एकीकडे भारत संघ म्हणून चांगली कामगिरी करत आहे, पण दुसरीकडे, विराट कोहली हा कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने अपयशी ठरताना दिसत आहे. विराट सध्या त्याचा 107वा कसोटी सामना खेळतोय, पण त्याचा कसोटी सरासरीचा आलेख हा सातत्याने घसरत चालल्याचे दिसत आहे. या लेखातून आपण विराटच्या 100 ते 107 कसोटी सामन्यांदरम्यानच्या सरासरीची आकडेवारी पाहूयात.
बुधवारपासून (दि. 1 मार्च) सुरू झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील तिसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) समाधानकारक खेळी करू शकला नाही. त्याने इंदोर कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 52 चेंडूंचा सामना करताना 22 धावांवर बाद झाला. या धावा करताना त्याने फक्त 2 चौकार मारले. त्यानंतर दुसऱ्या डावात विराटकडून संघाचा डाव सावरण्याची अपेक्षा असतानाच, तिथेही तो अपयशी ठरला. दुसऱ्या डावात विराटने 26 चेंडूंचा सामना केला. इथेही त्याने 2 चौकार मारले, पण त्याला फक्त 13 धावाच करता आल्या. अशाप्रकारे विराट दोन्ही डावात मिळून फक्त 35 धावा करू शकला. यामुळे त्याची कसोटी सरासरीही घसरली. हा विराटचा 107वा कसोटी सामना होता. यामध्ये त्याची सरासरी 48.12 इतकी आहे.
विराटची कसोटी सरासरी
विराटने त्याचा 100वा कसोटी सामना खेळला होता, तेव्हा त्याची सरासरी ही 50.35 इतकी होती. मात्र, त्यानंतर त्याने पुढे खेळलेल्या सातही कसोटीत त्याची सरासरी घसरतच गेली. 101व्या कसोटी सामन्यात त्याची सरासरी 49.95 इतकी होती. 102व्या कसोटीत त्याची सरासरी 49.53, 103व्या कसोटीत 49.35 सरासरी, 104व्या कसोटीत 48.90 सरासरी, 105व्या कसोटीत 48.68 सरासरी आणि 106व्या कसोटीत 48.49 इतकी सरासरी होती. (Test Average by Virat Kohli see here)
विराटची कसोटी कारकीर्द
विराटने त्याच्या कसोटी कारकीर्दीत आतापर्यंत 107 कसोटी सामने खेळताना 182 डावात 48.13च्या सरासरीने 8230 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 27 शतके आणि 28 अर्धशतकेही झळकावली आहेत. 254 ही कसोटीतील त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
विराटच्या कसोटी सरासरीची घसरता आलेख
100वा कसोटी सामना – 50.35
101वा कसोटी सामना – 49.95
102वा कसोटी सामना – 49.53
103वा कसोटी सामना – 49.35
104वा कसोटी सामना – 48.90
105वा कसोटी सामना – 48.68
106वा कसोटी सामना – 48.49
107वा कसोटी सामना – 48.12*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! इंग्लंडच्या महिला क्रिकेटरने उरकला साखरपुडा, पार्टनरला किस करत जगाला सांगितली आनंदाची बातमी
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीत सर्वोत्तम गोलंदाजी करणारे 4 खेळाडू; तीन भारतीय सोडले, तर लायन एकमेव ऑस्ट्रेलियन