fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कमी कसोटी सामने खेळूनही २००० पासून १४ कर्णधार पाहिलेले दोन संघ

१ जानेवारी २००० पासून जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळण्याचा विक्रम हा इंग्लंड संघाने केला आहे. या संघाने २५८ कसोटी सामने खेळले आहेत. या काळात ऑस्ट्रेलिया २२८, भारत २१२ तर दक्षिण आफ्रिका २०१ कसोटी सामने खेळले आहेत 

सर्वाधिक कसोटी सामने खेळणाऱ्या इंग्लंडने मात्र १ जानेवारी २००० पासून केवळ १० कर्णधार बदलले आहे. तर दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे केवळ ८ कर्णधार झाले आहेत.

भारताने या काळात सचिन तेंडूलकर, सौरव गांगुली, राहुल द्रविड, अनिल कुंबळे, विरेंद्र सेहवाग, एमएस धोनी, अजिंक्य रहाणे व विराट कोहली अशा ८ कर्णधारांकडे कसोटी संघाची धुरा दिली.

परंतु याच काळात १६७ कसोटी सामने खेळणाऱ्या पाकिस्तानचे व १९१ कसोटी सामने खेळणाऱ्या वेस्ट इंडिज संघाचे तब्बल १४ कर्णधार झाले. एवढे कर्णधार बदललेल्या वेस्ट इंडिज संघाने १९१ पैकी केवळ ४० कसोटी विजय मिळवले तर पाकिस्तानने १६७ पैकी ६४ विजय व ६८ पराभव पाहिले.

या काळात सर्वात कमी कसोटी कर्णधार हे न्यूझीलॅंड संघाचे झाले आहेत. या संघाने गेल्या २० वर्षांत केवळ ६ कर्णधार पाहिले आहेत. अफगाणिस्तान व आयर्लंड हे देश कमी सामने खेळले असूनही अफगाणिस्तानचे ४ सामन्यातच २ कर्णधार झाले आहेत. आयर्लंडने ३ सामने खेळले असून त्यांचे नेतृत्त्व एकाच खेळाडूने केले आहे. 

सामने, संघ व १ जानेवारी २००० पासून नेतृत्त्त्व केलेल्या कर्णधारांची संख्या

१६७ सामने- पाकिस्तान, १४ कर्णधार
१९१ सामने- वेस्ट इंडिज, १४ कर्णधार
११९ सामने- बांगालदेश, ११ कर्णधार
१९३ सामने- श्रीलंका, ११ कर्णधार
७१ सामने- झिंबाब्वे, ११ कर्णधार
२५८ सामने- इंग्लंड, १० कर्णधार
२०१ सामने- दक्षिण आफ्रिका, १० कर्णधार
२१२ सामने- भारत, ८ कर्णधार
२२८ सामने- ऑस्ट्रेलिया, ७ कर्णधार
१६६ सामने- न्यूझीलंड, ६ कर्णधार
४ सामने- अफगाणिस्तान, २ कर्णधार
३ सामने- आयर्लंड, १ कर्णधार

ट्रेडिंग घडामोडी –

हर्षा भोगले असे काय बोलले, ज्यामुळे धोनीचे चाहते झाले नाराज

विश्वचषकात आजपर्यंत टीम इंडियाचे नेतृत्व केलेले ७ कर्णधार व त्यांची कामगिरी

टॉप 5: आयसीसी विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक

वसिम जाफरच्या आयपीएल ड्रीम ११चा धोनी कर्णधार, बाकी १० खेळाडू आहेत असे

५ असे विक्रम, जे अजूनही वनडे क्रिकेटमध्ये कुणी केले नाहीत

 

You might also like