टी२० विश्वचषक २०२१ सुरुवातीपासूनच खूप रोमांचक राहिला आहे. टी२० विश्वचषक आता शेवटच्या टप्प्यावर आला असून फक्त अंतिम सामना खेळायचा बाकी आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया रविवारी (१४ नोव्हेंबर) आमनेसामने असतील. या सामन्यात दोन्ही संघांचे दिग्गज एकमेकांसोबत भिडतील, ज्यांनी यापूर्वी आयपीएलमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले आहे. आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन करण्यासोबतच त्यांनी त्यासाठी मोठा मोबदला देखील घेतला होता.
खेळाडूंना आयपीएल फ्रेंचायझीसाठी खेळताना मोठा मोबदला दिला जातो. आयपीएल २०२१ हंगामाच्या लिलावामध्ये न्यूझीलंड संघाचा कायल जेमिसन यावर्षीचा दुसरा सर्वात माहागडा खेळाडू ठरला होता. जेमिसनला विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने १५ करोड ही मोठी रक्कम देऊन विकत घतले होते. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल तिसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यालाही आरसीबीनेच १४.२५ करोड रुपयांमध्ये विकत घेतले होते.
टी२० विश्वचकाच्या अंतिम सामन्यात एकमेकांसोबत भिडणाऱ्या दोन्ही संघांपैकी १८ खेळाडू असे आहेत, ज्यांनी आयपीएलमध्ये दमदार प्रदर्शन केले आहे आणि त्या १८ पैकी १२ खेळाडूंना अंतिम सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाण्याची पूर्ण शक्यता आहे. जर अंतिम सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही बदल केले गेले, तर उरलेल्या तीन खेळाडूंपैकीच कोणालातरी संधी दिली जाऊ शकते. आपण या लेखात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या १८ खेळाडूंनी माहिती घेणार आहोत, ज्यांनी आयपीएलमध्ये मोठा मोबदला घेऊन त्यांच्या फ्रेंचायझीसाठी खेळले होते.
आयपीएलमध्ये खेळलेले १५ खेळाडू, जे टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात सहभागी होऊ शकतात.
ऑस्ट्रेलिया संघाचे खेळाडू
पॅट कमिन्स (कोलकाता नाइट रायडर्स) – १५.५ करोड रुपये
ग्लेन मॅक्सवेल (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – १४.२५ करोड रुपये
डेविड वार्नर (सनरायझर्स हैदराबाद) – १२.५ करोड रुपये
मार्कस स्टॉइनिस (दिल्ली कॅपिटल्स) – ४.८ करोड रुपये
स्टीव स्मिथ (दिल्ली कॅपिटल्स) – २.२ करोड रुपये
जोस हेजलवुड (चेन्नई सुपर किंग्ज) – २ करोड रुपये
मिशेल मार्श (सनरायझर्स हैदराबाद) – २ करोड रुपये
ऍडम झम्पा (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – १.५ करोड रुपये
केन रिचर्डसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – ४० लाख रुपये
न्यूझीलंड संघाचे खेळाडू
कायले जेमिसन (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) – १५ करोड रुपये
ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स) – ३.२ करोड रुपये
ऍडम मिल्ने (मुंबई इंडियन्स) – ३.२ करोड रुपये
केन विलियम्सन (सनरायझर्स हैदराबाद) – ३ करोड रुपये
जिमी निशम (मुंबई इंडियन्स) – ५० लाख रुपये
टिम सिफर्ट (कोलकाता नाइट रायडर्स) – ५० लाख रुपये
टीम साऊदी- (कोलकाता नाईट रायडर्स) – ५० लाख
मिचेल सॅंटनर- (चेन्नई सुपर किंग्स) – ५० लाख
ग्लेन फिलीप्स- (राजस्थान रॉयल्स) – ५० लाख