Suryakumar Yadav Injury: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज सूर्यकुमार यादवच्या घोट्याची शस्त्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यानी स्वतः सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली. यासोबतच तो लवकरच मैदानात परतणार असल्याचेही सांगितले.
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) गंभीर जखमी झाला होता. यावेळी त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती. दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला उचलून मैदानाबाहेर आणावे लागले होते. त्याच्या घोट्याचे मास फाटले होते. यानंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
सूर्यकुमार यादव यानी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, “शस्त्रक्रिया झाली आहे. माझ्या आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या काळजी आणि प्रार्थनेबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आणि तुम्हा सर्वांना सांगताना मला खूप आनंद होत आहे की, मी लवकरच परत येईन.”
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना सूर्याचा घोटा दुखावला. या सामन्याच्या पहिल्या डावात सूर्याने अप्रतिम शतक झळकावले होते. यानंतर जेव्हा दक्षिण आफ्रिकेचा संघ फलंदाजीला आला तेव्हा तिस-या षटकात प्रोटीस फलंदाजाने मारलेला फटका रोखल्यानंतर चेंडू फेकताना त्याला ही दुखापत झाली. यानंतर फिजिओने त्याला तत्काळ मैदानाबाहेर काढले. मात्र, सामन्यानंतरच्या कार्यक्रमात सूर्यकुमार यादव मी ठीक आहे, असे सांगताना दिसला. मी चालू शकतो. म्हणजे दुखापत फारशी गंभीर नाही.
Surgery done✅
I want to thank everyone for their concerns and well wishes for my health, and I am happy to tell you all that I will be back very soon 💪 pic.twitter.com/fB1faLIiYT
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) January 17, 2024
आफ्रिका दौऱ्यावरून सूर्यकुमार यादव भारतात परतला तेव्हा त्याच्या घोट्याचे स्कॅनिंग करण्यात आले. त्यात ग्रेड-2 लेव्हलची फट आढळून आली. यानंतर तो थोडे दिवस मैदानात परतू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून बाहेर राहिला. (The appearance of Shiledara of Team India, the tension of the team increased before the T20 World Cup)
हेही वाचा
IND vs AFG । रोहितच्या ‘त्या’ निर्णयावर माजी सहकाऱ्याची टीका; म्हणाला, ‘पुन्हा मैदानात यालाल नको होते’
‘रोहित भैयासोबतचा प्रत्येक क्षण…’, अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर रिंकू सिंगचं कर्णधाराबद्दल लक्षवेधी विधान