ऐतिहासिक मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान दुसरा कसोटी सामना सुरू आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियान संघाला भारताने पहिल्याच दिवशी केवळ 195 धावांवर रोखले. दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पकड मजबूत केली असून कर्णधार अजिंक्य राहणे शतक ठोकले आहे.
अजिंक्य उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत असून कोणताच गोलंदाज त्याला करु शकत नाही, हे पाहून अजिंक्यचे लक्ष विचलित करण्यासाठी तसेच गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांनी स्लेजिंगचा वापर सुरू केलेला दिसून आला.
भारताच्या डावातील 54 व्या षटकात नॅथन लायन अजिंक्यला गोलंदाजी करत होता. यादरम्यानच सिली पॉईंटवर उभ्या असलेल्या मॅथ्यू वेडने अजिंक्यला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. लायनला त्याचे संघ सहकारी ‘गोट ‘या नावाने हाक मारतात.
अजिंक्यला स्लेज करताना वेड लायनला म्हणाला, ‘गोट नको आता ईगल ( गरुड) होण्याची वेळ आहे’. त्यामुळे काही काळ मैदानात व समालोचक कक्षामध्ये हशा पिकली होती. काही वेळातच हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला आहे.
Move over GOAT, it's time for the Bald Eagle! 🦅 #AUSvIND pic.twitter.com/T2zXiMZaJb
— cricket.com.au (@cricketcomau) December 27, 2020
दरम्यान, सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला असून अजिंक्यच्या खेळीने सामना भारताकडे झुकलेला दिसत आहे. या सामन्याच्या दुसऱ्या दिवसाखेर रहाणे १०४ धावांवर नाबाद खेळत असून त्याला रवींद्र जडेजाने उत्तम साथ दिली आहे. तो ४० धावांवर नाबाद आहे. तसेच भारताच्या ५ बाद २७७ धावा झाल्या असून भारताने ८२ धावांनी आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसरा कसोटी सामना जडेजासाठी फारच खास, जाणून घ्या कारण
सिराजने उलगडले गुपित! कर्णधार अजिंक्यने जेव्हा गोलंदाजी करण्यास बोलवले तेव्हा झाली ‘अशी’ चर्चा
रहाणेच्या शतकानंतर कोहलीने केले कौतुक; ट्विट करत म्हणाला…