मुंबई । 2018 मध्ये डोप टेस्ट अयशस्वी झाल्याबद्दल बांगलादेशचा युवा वेगवान गोलंदाज काझी आनिक इस्लामवर राष्ट्रीय क्रिकेट बोर्डाने दोन वर्षांसाठी बंदी घातली आहे. काजीने 2018 साली झालेल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात बांगलादेशकडून खेळताना सर्वाधिक बळी घेतले.
बीसीबी बोर्डाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “बीसीबीने अनिकच्या बाबतीत दोष लक्षात घेता त्याचे वय आणि अनुभवाची कमतरता विचारात घेतली होती. खरं म्हणजे त्याच्या खेळातील कामगिरी वाढवण्यासाठी त्याने हे केले नाही. जेव्हा त्यास यासंदर्भात कळविण्यात आले तेव्हा त्याने हा आरोप स्वीकारला.”
19 वर्षांखालील विश्वचषकात खेळण्याव्यतिरिक्त चार प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये अनिकने 15 बळी घेतले आहेत. नॅशनल क्रिकेट लीग दरम्यान बंदी घातलेला पदार्थ मेथमॅफेटामाईनमध्ये तो सकारात्मक आढळला. 21 वर्षीय खेळाडूने या गुन्ह्याची कबुली दिली. त्याची दोन वर्षांची बंदी 8 फेब्रुवारी 2019 पासून सुरू होईल.
महत्वाच्या बातम्या-
…म्हणून वेगवान गोलंदाजी करणारा युवराज सिंग बनला अष्टपैलू क्रिकेटपटू
आयपीएलचे आयोजन यूएईत ३ ठिकाणी झाल्याने मॅच फिक्सिंगला बसेल आळा, पहा काय आहेत सुविधा
फक्त क्षेत्ररक्षणासाठी मिळाला होता मॅन ऑफ द मॅच, सुवर्णाक्षरांनी लिहीले गेले नाव
ट्रेंडिंग लेख –
युएईत होणाऱ्या आयपीएल २०२० मध्ये हे ४ संघ करु शकतात प्लेऑफमध्ये प्रवेश
२५०पेक्षा जास्त वनडे सामने खेळूनही या ५ खेळाडूंवर कर्णधारपद कायम रुसलेच
धीरज जाधव- गुणवत्ता असून देशासाठी खेळू न शकलेला महाराष्ट्राचा महारथी