जपानची टोक्यो ऑलिम्पिक 2020 स्पर्धा येत्या 23 जुलैपासून खेळवली जाणार आहे. त्याचबरोबर ही स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर दिल्ली सरकारने दिल्लीच्या खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी एक उत्कृष्ट अशी योजना आखली आहे. ज्यामुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळेल व ते स्पर्धा जिंकण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतील.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या दिल्लीतील खेळाडूंना सुवर्णपदक जिंकल्यानंतर 3 कोटी, रौप्यपदक जिंकल्यानंतर 2 कोटी आणि कांस्यपदक जिंकण्यासाठी 1 कोटी रुपये बक्षिसाच्या स्वरूपात रोख रक्कम देण्यात येणार असल्याचे दिल्ली सरकारने घोषित केले आहेत. याचबरोबर हे पदक जिंकणाऱ्या खेळाडूंच्या प्रशिक्षकांना दहा लाख रुपयांची रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचे सांगितले आहे. दिल्लीहून ऑलिम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंमध्ये मनिका बत्रा, दीपक कुमार, अमोज जेकब आणि सार्थक भांब्री यांचा समावेश आहे.
खेलरत्न पुरस्कार सन्मानित मानिका बत्रा टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत टेबल टेनिस या खेळातून भारताचे प्रतिधित्व करणार आहे. तर दीपक कुमार टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत शूटिंग या खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. दीपक कुमार याने 10 मीटर एयर राइफल शूटिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला आहे. दिल्लीच्या गुरू तेज बहादूर खालसा महाविद्यालयाचा विद्यार्थी अमोझ जेकब 4 × 400 मीटर रिलेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. त्याचबरोबर दिल्लीचा सार्थक भांबरी देखील 4 × 400 मीटर रिलेमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणाऱ्या खेळाडूंना विद्यापीठ तयार करणार
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले की, “भविष्यातील खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळावे यासाठी दिल्ली सरकारची तयारी जोरात सुरू आहे. आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की जागतिक दर्जाचे क्रीडा विद्यापीठ तयार करण्यासाठी कोणतीही कसर ठेवली जाणार नाही. ऑलिम्पिक खेळात जे खेळाडू देशासाठी पदक जिंकतील त्यांना तयार करण्याचे काम दिल्ली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी करणार आहे.”
क्रीडा विद्यापीठ दिल्लीला क्रीडा केंद्र म्हणून विकसित करेल
सिसोदिया पुढे म्हणाले की, “क्रीडा विद्यापीठ दिल्लीला स्पोर्ट्स हबच्या रूपात विकसित करणार आहे. या दिशेने खेळाला चालना देण्यासाठी, विद्यापीठ संपूर्ण दिल्लीमध्ये खेळांच्या माध्यमातून क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करता येईल. ज्यामुळे दिल्लीत तसेच संपूर्ण देशात क्रीडामय वातावरण तयार होईल. ज्यामुळे आम्ही 2048 च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी यजमान म्हणून स्पर्धेचे आयोजन करता येईल.”
“त्याचबरोबर दिल्ली स्पोर्ट्स विद्यापीठ अंतर्गत दिल्ली स्पोर्ट्स शाळेची देखील स्थापना केली जात आहे. पुढच्या सत्रापासून दिल्ली स्पोर्ट्स शाळेमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू होतील. जेथे विद्यार्थ्यांची क्षमता आणि आवडी लक्षात घेऊन त्यांच्यासाठी खेळांची निवड केली जाईल. त्याचबरोबर त्यांना उत्तम प्रशिक्षणही दिले जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये पदकांची लयलूट केल्यास भारतीय खेळाडू होणार कोट्यधीश, महाराष्ट्र सरकार देणार इतके बक्षीस
“फक्त तो संघात आहे, हेसुद्धा कळालं की विरोधी संघाची धाकधूक वाढते”
टीम वर्क! हातून चेंडू निसटल्याने ब्रावोने पायाने मारली किक, मग काय सहकारी ऍलेनने टिपला झेल