स्टार स्पोर्ट्स प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेतील अंतिम सामना 2-2 असा बरोबरीत

हैदराबाद। ताय झु यिंगने बंगळूरु रॅपटर्स कडून खेळताना नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्स संघाच्या मिशेल ली ला पराभूत करत स्टार स्पोर्ट्स प्रिमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत अंतिम सामन्यात 2-2 अशी बरोबरी साधली.

हैदराबाद येथे सुरु असलेल्या या अंतिम सामन्यात बंगळुरु रॅपटर्स संघाकडून खेळताना बी साई प्रणितने नॉर्थ ईस्टर्न वॉरियर्सच्या ली चेऊक यिऊला 2-1 अशा फरकाने पराभूत केले. सामन्यातील पहिला गेम यिऊने प्रणितला 15-14 अशा फरकाने नमवित आघाडी घेतली. दुस-या गेममध्ये प्रणितने पुनरागमन करत गेम 15-9 असा जिंकत लढत बरोबरीत आणला. सामन्यातील निर्णायक गेममध्ये प्रणितने आपला हाच फॉर्म कायम ठेवत गेम 15-3 असा नावे करत संघाला आघाडी मिळवून दिली.

Related Posts

पुरुष दुहेरीच्या सामन्यात बोदीन इसारा व ली योंग डाए जोडीने बंगळुरु रॅपटर्सच्या अरुण गारगा व रिआन अगुंग सापुत्रो जोडीला 2-1 असे नमविले. पहिला गेम इसारा व डाए जोडीने 15-11 असा आपल्या नावे करत आघाडी घेतली. दुस-या गेममध्ये गारगा व सापुत्रो जोडीने 15-13 असा जिंकत बरोबरी साधली.निर्णायक गेममध्ये इसारा व डाए जोडीने 15-14 अशी बाजी मरत विजय मिळवला.

महिला एकेरीच्या सामन्यात ताय झु यिंग समोर मिशेल ली चे आव्हान होते. सामन्यातील पहिला गेम यिंगने 15-9 असा आपल्या नावे करत आघाडी घेतली. दुस-या गेममध्ये यिंगला ली हिने आव्हान दिले पण, 15-12 असा गेम जिंकत लढत 2-2 अशी बरोबरीत आणली.

You might also like