fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

चिंचपोकळीत रंगणार मोसमातील पहिली राज्यस्तरीय कुमार गट “चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या व मुंबई शहर कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने चिंचपोकळी सार्वजनिक उसत्व मंडळ आयोजित स्पर्धा चिंतामणी चषक राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धा २०१९ (निमंत्रित संघ) दि ०९ जानेवारी ते १२ जानेवारी या कालावधीत लालबाग, मुंबई येथे राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धां आयोजित केली आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी या नावाने ओळखला जाणारा चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळचा यंदा ९९ वे वर्ष आहे. यामंडळ कडून वर्षभरात अनेक उपक्रम राबविले जातात. दर वर्षी “चिंतामणी चषक” कबड्डी स्पर्धाच आयोजन केले जाते. यंदा प्रथमच मंडळाकडून राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धांचा आयोजन केल जात आहे. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सर्व धडाडीचे कार्यकर्ते जोमाने तयारी करत आहेत.

कबड्डी स्पर्धेत एकूण ९ जिल्ह्यातील १८ संघ सहभागी होणार आहेत. १८ संघाचे ६ गटात विभाजन करून प्रथम दोन दिवस साखळी सामने खेळवण्यात येतील. त्यानंतर बादफेरीचे सामने खेळवण्यात येतील. मातीच्या २ मैदानावर सामने खेळवण्यात येणार असून सर्व सामने सायंकाळी ५ ते १० च्या दरम्यान होतील.

स्पर्धेत सहभागी संघ- यास्पर्धेसाठी राज्यातून मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सांगली, नाशिक, पुणे व रत्नागिरी या जिल्ह्यातील संघ सहभागी होत आहेत. मुंबई शहर मधील नामवंत ८ संघ, मुंबई उपनगर व ठाणे चे प्रत्येकी २-२ संघ, इतर जिल्ह्यातील प्रत्येकी १-१ संघ असणार आहे.

स्पर्धा आयोजक- “चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ” चिंचपोकळी, मुंबई हे स्पर्धेचे आयोजक आहेत.

स्पर्धाचा कालावधी- या राज्यस्तरीय कुमार गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन ०९ जानेवारी ते १२ जानेवारी दरम्यान चार दिवस करण्यात आले आहे. सामने सायंकाळ सत्रात मातीच्या मैदानावर खेळवण्यात येतील.

स्पर्धाचे ठिकाण- सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडांगण (लाल मैदान), गणेश टॉकीजच्या मागे, लालबाग, मुंबई-१२

You might also like