fbpx
Thursday, April 22, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

“मला लढायला आवडते. मी घरी बसून काय करु?” – सायना नेहवाल

December 4, 2020
in बॅडमिंटन, टॉप बातम्या
0

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल मागील काही काळापासून खराब फॉर्म आणि दुखापतीशी झगडत आहे. त्यामुळे पुढीलवर्षी होणाऱ्या टोकियो ऑलिंपिकमधील तिच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. पण आता ती या ऑलिंपिकच्या शर्यतीत कायम असल्याचे तिने सांगितले आहे.

सायना पुढीलवर्षी जानेवारीमध्ये होणाऱ्या एशियन टूर स्पर्धेतून बॅडमिंटनमध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. एका व्हर्चूएल चर्चा सत्रात ती म्हणाली, ‘मला माहित आहे ऑलिंपिक सर्वांच्याच डोक्यात आहे. ही नक्कीच मोठी स्पर्धा आहे. पण त्याआधी तुम्हाला अनेक स्पर्धांबद्दल विचार करावा लागतो. मला माझी लय मिळवून अव्वल 20 क्रमांकांमध्ये असणाऱ्या खेळाडूंना पराभूत करावं लागेल.’

तसेच ती म्हणाली, ‘आधी 2 ते 3 महिने सराव करावा लागेल. 7-8 स्पर्धा खेळण्यासाठी पुर्णपणे सज्ज असायला हवे. त्यानंतरच मी ऑलिंपिकबद्दल विचार करु शकेल. पण नक्कीच मी त्यासाठी शर्यतीत असेल. मला चांगली कामगिरी करायची आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करत आहे.’

30 वर्षीय सायनाने असेही म्हटले आहे की ती रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोविच, राफेल नदाल आणि सेरेना विलियम्स यांच्याकडून प्रेरणा घेते. त्यांनीही वयाच्या 30 व्या वर्षानंतर अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत.

तसेच ऑलिंपिक पदक विजेती सायना म्हणाली, ‘मला लढायला आवडते. मी घरी बसून काय करु? हे माझे आयुष्य आहे, हेच माझे काम आहे.’ त्याचबरोबर सायना म्हणाली आता ती तंदुरुस्त आहे.


Previous Post

नटराजनचा ऑस्ट्रेलियात डंका, केली बुमराहच्या विक्रमाची बरोबरी

Next Post

भारताच्या आव्हानाच्या दिशेने कूच करणाऱ्या स्मिथचा सॅमसनने घेतला कठीण झेल, Video जोरदार व्हायरल

Related Posts

Photo Courtesy: Facebook/IPL
IPL

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! कोरोनातून सावरल्याने ‘हा’ सदस्य करणार पुनरागमन

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@sportzhustle
IPL

आयपीएल २०२१ चा भावूक क्षण! रैनाने धरले भज्जीचे पाय, पाहा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

व्हिडिओ : वाईड म्हणून सोडला चेंडू आणि पायामागून झाला बोल्ड, रसेल झाला अजब पद्धतीने बाद

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL
IPL

सॅम करनच्या षटकात पॅट कमिन्सने चोपल्या तब्बल ३० धावा, पाहा डोळे दिपवणाऱ्या फटकेबाजीचा व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Screengrab/@Cricsphere
IPL

डेव्हिड वॉर्नरला बाद केल्यानंतर फेबियन एलनने केला अजब डान्स, पाहा भन्नाट व्हिडिओ

April 22, 2021
Photo Courtesy: Twitter/@EmiratesCricket
क्रिकेट

आयसीसीची मोठी कारवाई! ‘या’ कारणामुळे युएईच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी

April 22, 2021
Next Post

भारताच्या आव्हानाच्या दिशेने कूच करणाऱ्या स्मिथचा सॅमसनने घेतला कठीण झेल, Video जोरदार व्हायरल

Video: चेंडू लागला जडेजाच्या हेल्मेटला अन् त्रास झाला ऑस्ट्रेलियाला

Big Bash League: अफगाणिस्तानच्या युवा फिरकीपटूला झाली कोरोनाची लागण

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.