पुणे, दि. 6 फेब्रुवारी 2024 – सेंट व्हिन्सेंट हायस्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्यातर्फे आयोजित सेंट व्हिन्सेंट ज्युनियर लीग स्पर्धेत हॉकी लीगमध्ये लॉयला हायस्कुल संघाने 15 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
सेंट व्हिन्सेंट हायस्कूलच्या फुटबॉल, हॉकी व बास्केटबॉल मैदानावर सुरु असलेल्या या स्पर्धेत हॉकी लीग स्पर्धेत अखेरच्या साखळी फेरीत लॉयला हायस्कुल संघाने सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ संघाचा 6-3 असा पराभव केला. विजयी संघाकडून स्कायलर राज(2,4,10,15 मि.)ने चार गोल, मार्क डेझ(12,18 मि.)ने दोन गोल केले. लॉयला हायस्कुल संघाने 5 सामन्यात 5 विजय, 15 गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला.
दुसऱ्या सामन्यात शौर्य मेंगे(3,4,6,20 मि.) याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ संघाने सेंट पॅट्रिक्स हायस्कूल ब संघाचा 8-0 असा पराभव केला. सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ संघाने 5 सामन्यात 4विजय, 1पराभव, 12 गुणांसह दुसरा क्रमांक पटकवला.
अन्य लढतीत आर्यन सावंत(10 मि.)याने नोंदवलेल्या एकमेव गोलाच्या जोरावर सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने सेंट पॅट्रिक्स हायस्कूल ब संघाचा 1-0 असा पराभव केला. सेंट व्हिन्सेंट हायस्कूल संघाने 5सामन्यात 3विजय, 2पराभव, 9गुणांसह तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघाला करंडक, पदके अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण हॉकी महाराष्ट्रचे वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज भोरे, सेंट व्हिन्सेंट हायस्कूलचे प्राचार्य फ्रान्सिस पाठेकर, उपप्राचार्य फादर राजा, व्यवस्थापक फादर फ्रान्सिस डिसुझा आणि डॉ विल्सन अँड्र्यू यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: हॉकी लीग: साखळी फेरी:
लॉयला हायस्कुल: 6(स्कायलर राज 2,4,10,15 मि., मार्क डेझ 12,18 मि.)वि.वि.सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ: 3 (शौर्य मेंगे 5,16 मि., प्रणव आहिर 11 मि.);
सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अ: 8 (शौर्य मेंगे 3,4,6,20 मि., अर्णव जांभुळकर 12,19 मि., प्रणव आहिर 10,16 मि.)वि.वि.सेंट पॅट्रिक्स हायस्कूल ब: 0;
सेंट व्हिन्सेंट हायस्कूल: 1 (आर्यन सावंत 10 मि.)वि.वि.सेंट पॅट्रिक्स हायस्कूल ब: 0;
महत्वाच्या बातम्या –
IND vs ENG । बॅझबॉलच्या नादात जो रुट स्वतःचा खेळ विसरतोय? माजी कर्णधाराचा दावा
IPL 2024 आधी धोनीने देवरी मातेचा घेतला आशीर्वाद! सर्जरीनंतर मैदानात करतोय पुनरागमन