Thursday, February 2, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारत आणि पाकिस्तान दौरा करणार न्यूझीलंड संघ, दोघांना मिळणार संघाचे नेतृत्व करण्याची संधी

भारत आणि पाकिस्तान दौरा करणार न्यूझीलंड संघ, दोघांना मिळणार संघाचे नेतृत्व करण्याची संधी

December 19, 2022
in क्रिकेट, टॉप बातम्या
New-Zealand-Cricket-Team

Photo Courtesy: Twitter/BlackCaps


न्यूझीलंड क्रिकेट संघ जानेवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. त्याआधी न्यूझीलंडला पाकिस्तान दौरा पूर्ण करायचा आहे. पाकिस्तानविरुद्ध त्यांनी तीन सामन्यांची वनडे मालिका 10 जानेवारीपासून खेळायची आहे. त्यानंतर संघ 18 जानेवारीपासून भारताविरुद्ध तीन सामन्यांडी वनडे मालिका खेळेल. या मालिकेतील शेवटचा सामना 24 जानेवारीला खेळला जाईल. या दोन्ही मालिकांमधील अंतर खूपच कमी आहे. मात्र, दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंडने दोन वेगवेगळे कर्णधार नियुक्त केले गेले आहेत. तसेच संघातील खेळाडू देखील वेगवेगळे आहेत. 

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने रविवारी (18 डिसेंबर) पाकिस्तान आणि त्यानंतर खेळल्या जाणाऱ्या भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्यांचा संघ घोषीत केला. त्यांचा अष्टपैलू हेनरी शिपली पहिल्यांदाच न्यूझीलंड संघात सहभागी होणार आहे. शिपली पाकिस्तानविरुद्ध आणि त्यानंतर भारताविरुद्ध अशा दोन्ही वनडे मालिकांमध्ये सहभागी असणार आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या वनडे मालिकेत न्यूझीलंड संघाचे नेतृत्वत केन विलियम्सन करणार आहे. तर दुसरीकडे भारताविरुद्ध टॉम लाथम त्यांच्या वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे.

या दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंडने 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. पाकिस्तानविरुद्ध लाथम संघाचा कर्णधार नसला, तरी तो या संघात नक्कीच सहभागी आहे. पाकिस्तानविरुद्ध कर्णधाराची भूमिका पार पाडल्यानंतर केन विलियम्सन पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी मायदेशात परणार आहे. यावेळी त्याच्यासोबत वेगवान गोलंदाज टिम साउदी आणि प्रशिक्षक गॅरी स्टीड देखील मायदेशायत माघारी येतील. अशात भारताविरुद्धच्या वनडे मालिकेत मुख्य प्रशिक्षकाची भूमिका ल्यूक रोंची पार पाडतील. (The New Zealand team that will tour India and Pakistan, these two players will get a chance to lead the team)

Squad News | The ODI Series against Pakistan starts on the 10th of January in Karachi with the first match against India on the 18th in Hyderabad. More | https://t.co/I20Xhe1t7Z #PAKvNZ #INDvNZ pic.twitter.com/JZbP5VSPOK

— BLACKCAPS (@BLACKCAPS) December 18, 2022

दोन्ही मालिकांसाठी न्यूझीलंड संघ – 
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी न्यूझीलंड संघ – केन विलियमसन (कर्णधार) टॉम लाथम, फिन ऐलन, माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, लोकी फर्ग्यूसन, मॅट हेनरी, एडम मिल्ने, डेरिल मिशेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, हेनरी शिपली, ईश सोढ़ी, टिम साउदी.

भारताविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी न्यूझीलंड संघ – टॉम लाथम (कर्णधार), फिन ऐलन, माइकल ब्रेसवेल, मार्क चैपमैन, डेवोन कॉनवे, जैकब डफी, लोकी फर्ग्यूसन, मैट हेनरी, एडम मिल्ने, डेरिल मिशेल, हेनरी निकोल्स, ग्लेन फिलिप्स, मिशेल सेंटनर, हेनरी शिपली, ईश सोढ़ी.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO: अन् एम्बाप्पेच्या गोलने राष्ट्रपतीही उड्या मारू लागले; पाहा तो क्षण
“असल्या खेळपट्ट्या खेळायला देतात का?”; दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार भडकला; पंचांवरही लावले आरोप 


Next Post
Photo Courtesy: Twitter

गोष्ट आधुनिक फुटबॉलचा चक्रवर्ती लिओनेल मेस्सीची

FIFA World Cup Trophy

फीफा विश्वचषकाचे आतापर्यंतचे विजेते, पाहा संपूर्ण यादी

Kylian Mbappe Golden Boot winner

थेट फायनलमध्येच हॅट्ट्रिक मारत एम्बाप्पेने जिंकला गोल्डन बूट; याआधी 'या' दिग्गजांनी केलाय नावे

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143