इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात अनेक दिग्गज भारतीय गोलंदाज होऊन गेलेत आणि आहेत. यामध्ये झहीर खान, आशिष नेहरा, अनिल कुंबळे, हरभजन सिंग अशा अनेक गोलंदाजांचा समावेश होतो. या गोलंदाजांनी आपल्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनाने अनेक दमदार विक्रम नोंदवले आहेत. मात्र एक असा विक्रम आहे, जो केवळ एक भारतीय गोलंदाज करु शकला आहे. त्याच्याव्यतिरिक्त आजवर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला हा विक्रम करता आलेला नाही.
हा विक्रम म्हणजे, आयपीएलमध्ये २ वेळा एका सामन्यात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणे. आयपीएल इतिहासात आतापर्यंत केवळ २ गोलंदाज हा विक्रम करु शकले आहेत. त्यामध्ये एका परदेशी आणि एका भारतीय गोलंदाजाचा समावेश आहे. The Only 1 Indian Bowler Who Take 5 Wickets Haul In IPL 2 Times
हा शानदार विक्रम आपल्या नावावर करणारा आयपीएल इतिहासातील एकमेव भारतीय गोलंदाज म्हणजे, राजस्थान रॉयल्स संघाचा जयदेव उनाडकट. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ७३ सामने खेळले आहेत, त्यात त्याने २८.४७च्या सरासरीने ७७ विकेट्स घेतल्या आहेत. दरम्यान त्याने २ वेळा एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.
उनाडकटने १० मे २०१३ साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना पहिल्यांदा एका सामन्यात ५ विकेट्स घेण्याचा विक्रम केला होता. दिल्ली डेअरडेविल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ४ षटके गोलंदाजी करताना २५ धावा देत ५ विकेट्स चटकावल्या होत्या. तर ६ मे २०१७ रोजी राइजिंग पुणे सुपरजायंट्स विरुद्ध सनराइजर्स हैद्राबाद संघातील सामन्यात त्याने दुसऱ्यांदा हा विक्रम केला होता. यावेळी पुण्याच्या संघाकडून ४ षटके गोलंदाजी करताना त्याने ३० धावा देत ५ विकेट्स घेतल्या होत्या.
उनाडकटव्यतिरिक्त हा विक्रम नोंदवणारा परदेशी गोलंदाज म्हणजे, जेम्स फॉकनर होय. त्याने २७ एप्रिल २०१३ला आणि १७ मे २०१३ रोजी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना सनराइजर्स हैद्राबादविरुद्ध हा विक्रम नोंदवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
रवींद्र जडेजाला खुणावतोय ‘हा’ विक्रम; अशी कामगिरी करणारा ठरेल पहिला अष्टपैलू खेळाडू
आयपीएलमध्ये सट्टेबाजी रोखण्यासाठी बीसीसीआयने उचलले कठोर पाऊल; ‘या’ कंपनीची घेणार मदत
जॉनी बेयरस्टोची आयसीसीच्या वनडे क्रमवारीत भरारी; तर विराट कोहली, रोहित शर्मा या क्रमांकावर…
ट्रेंडिंग लेख –
हे ५ खेळाडू आयपीएलमधून त्यांच्या कर्णधारापेक्षाही करणार अधिक कमाई
असे ३ खेळाडू, जे दिल्ली कॅपिटल्स संघाला मिळवून देऊ शकतात पहिले आयपीएल विजेतेपद