महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जांभळी क्रीडा मंडळ, जांभळी यांच्या सौजन्याने राज्यस्तरीय व्यावसायिक निमंत्रीत पुरुष कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. स्व. डॉ आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आलं आहे.
सदर स्पर्धेत १४ संघानी भाग घेतला होता. त्यापैकी एयर इंडिया, मुंबई बंदर, भारत पेट्रोलियम, महिंद्रा अँड महिंद्रा, महाराष्ट्र पोलीस, इनकम टॅक्स पुणे, सेंट्रल बँक, आयएसपील युवा पलटण मुंबई संघानी बादफेरीत प्रवेश केला.
दुसऱ्या दिवशी अ गटात एयर इंडिया विरुद्ध मुंबई बंदर यांच्यात झलेल्या लढतीत मुंबई बंदरने ३८-२८ असा विजय मिळवला. मुंबई बंदर कडुन मनोज बोन्द्रे, स्मितील पाटील यांनी उत्कृष्ट खेळ केला. मुंबई बंदरने दुसऱ्या सामन्यांत शिवान्स स्पोर्ट्स एंटरप्राइज वर ५०-२३ असा विजय मिळवत बादफेरीत प्रवेश केला.
ब गटात भारत पेट्रोलियम विरुद्ध मुंबई पोलीस यांच्यात झालेल्या लढतीत भारत पेट्रोलियम संघाने ३७-२२ असा विजय संपादन केला. तर महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध भारत पेट्रोलियम यांच्यात झालेल्या सामन्यांत महिंद्रा संघाने ४६-२६ अशी बाजी मारत गटातून विजयी निघाले तर भारत पेट्रोलियम गटातून उपविजयी निघाले.
क गटात इनकम टॅक्स पुणे संघाने महाराष्ट्र पोलीस संघावर ३२-२२ असा विजय मिळवला. याविजया संघ इनकम टॅक्स संघ गटात विजयी ठरला. तर महाराष्ट्र पोलीस २ विजयशह गटात उपविजेता ठरला. ड गटात आयएसपिल युवा पलटण मुंबई संघाने ४८-१४ असा सेंट्रल बँकवर विजय मिळवत गटात तिन्ही सामने जिंकले. तर सेन्ट्रल बँकने गटात टीबीएम रायगड व ठाणे मनपा संघावर विजय मिळवत बादफेरीत केला.
उपांत्यपूर्व फेरीचे सामने (५ फेब्रुवारी २०२०)
१) मुंबई बंदर विरुद्ध सेंट्रल बँक
२) भारत पेट्रोलियम विरुद्ध इनकम टॅक्स
३) महिंद्रा अँड महिंद्रा विरुद्ध महाराष्ट्र पोलीस
४) एयर इंडिया विरुद्ध आयएसपिल युवा पलटण