सध्या भारत आणि इंग्लंड संघांमध्ये कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेचा पहिला सामना ४ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. हे सामने नॉटिंघममध्ये खेळले जात आहेत. त्याचबरोबर भारतीय कसोटी संघातील खेळाडू शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान या खेळाडूंना दुखापत झाली आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव आणि पृथ्वी शॉ यांना इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यांसाठी बोलवले आहे. परंतु हे दोन खेळाडू मैदानात उतरण्याअगोदर त्यांना विलगिकरणाचा कालावधी पूर्ण करायचा आहे. सध्या तरी हे दोघेही विलगिकरणात राहत आहेत.
शर्मा कुटुंबाची सूर्यकुमारसोबत भेट
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव सध्या विलगिकरणात आहे. याच सूर्यकुमारला गुरुवारी (०५ ऑगस्ट) आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा भारतीय संघाचा सलामीवीर रोहित शर्मा त्याच्या कुटुंबासोबत त्याच्या हॉटेलजवळ पोहचले. सूर्यकुमार त्यांना पाहून खुश देखील झाला आणि त्याला आश्चर्यही वाटले.
फोटो केले शेअर
जेव्हा रोहित सूर्यकुमारला भेटायला आला तेव्हाचा एक क्षण सूर्यकुमारने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. रोहित शर्मा व्यतिरिक्त त्याची पत्नी रितिका सजदेह आणि मुलगी समायरा देखील या फोटोमध्ये दिसून येत आहेत.
हा फोटो शेअर करत सूर्यकुमार यादवने मजेदार कॅप्शन देखील लिहिले आहे. त्याने लिहिले की, ‘पाहा, मी विलगिकरणाचे नियम पाळत आहे की नाही? हे पाहण्यासाठी कोण आले आहे, सॅमी.’ त्याचबरोबर एका व्हिडिओमध्ये रोहित आपल्या मुलीला ‘सूर्या अंकल’ असल्याचे सांगताना दिसून येत आहे. आई रितिकाने लहान समायराला आपल्या कडेवर उचलले आणि सॅमी सूर्याला बाल्कनीच्या दिशेने हात करताना दिसून येत आहे.
#RohitSharma & family catching up with Suryakumar Yadav outside his hotel balcony.#IndvsEng #suryakumaryadav #BCCI pic.twitter.com/OhopZ53JBL
— Shubham Shah (@bollywoodWaalah) August 6, 2021
रोहित आणि सूर्यकुमार यांच्यात आहे घट्ट मैत्री
भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज सूर्यकुमार यादव आणि सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा हे आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचे सदस्य आहेत. त्यामुळेच या दोघांमध्ये मजबूत असे नाते संबंध आहे. येत्या कसोटी सामन्यांमध्ये रोहित आणि सूर्यकुमार एकत्र फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. भारत आणि इंग्लंड मध्ये दुसरा कसोटी सामना १२ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs IND, 1st Test, 3rd Day: रॉबिन्सनच्या चेंडूवर रिषभ पंत झेलबाद, भारताच्या ५ बाद १४५ धावा
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा
‘चेंडू माझ्या पट्ट्यात आला तर मी चौकार किंवा षटकार ठोकणारच,’ रोहितचे टीकाकारांना सणसणीत उत्तर