महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सांगली जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, कुंडल यांच्या विद्यमाने राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेचा आयोजन करण्यात आहे. महाराष्ट्र राज्याचे नेते आदरणीय नेते डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या स्मरणार्थ गुरुवार दिनांक ०९ जानेवारी २०२० ते रविवार दिनांक १२ जानेवारी २०२० पर्यत समर्थ कॉलनी, कुंडल, ता. पलूस, जि. सांगली येथे यास्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे.
नवयुवक कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ यांच्या सोबत मा. महेंद्र (आप्पा) लाड मित्र मंडळ, कुंडल, संकल्प युवा प्रतिष्ठान, जयभीम मंडळ कुंडल हे सर्व संयोजक म्हणून स्पर्धेच आयोजनाची तयारी करणार आहेत.
सदर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुषाचे २० व महिलांचे २० संघ सहभागी होणार आहेत. सदर स्पर्धा मातीच्या मैदानावर होणार असून ४ क्रीडांगणे बनवली जाणार आहेत. सुरुवातीला साखळी पद्धतीने व नंतर बाद पद्धतीने सामने खेळण्यात येतील.
सांघिक व वैयक्तिक बक्षिसाचा वर्षाव होणार आहे. विजेत्या पुरुष व महिला संघास प्रत्येकी १,००,०००/- रोख रुपये, उपविजेते संघास प्रत्येकी ७५,००० /- रुपये, तसेच तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाच्या संघास प्रत्येकी ५०,०००/- रुपये व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक बक्षिसे ही रोख रक्कमेच्या स्वरूपात देण्यात येणार आहेत.
चिंतामणी चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत स्वस्तिक, अमर क्रीडा मंडळ संघाचा बादफेरीत प्रवेश
वाचा????https://t.co/KWu7F4uexM????#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 4, 2020
क्रांती क्रीडा महोत्सवामध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार
वाचा????https://t.co/E8YXIR4IeL????#Kabaddi #म #मराठी— Maha Sports (@Maha_Sports) January 4, 2020