भारताचा यष्टीरक्षक कर्णधार एमएस धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट करत निवृत्तीची संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांनी निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. या व्हिडिओत धोनीचे आवडते ‘मैं पल दो पल का शायर हूँ’ हे गाणे वाजत आहे.
धोनीच्या निवृत्तीनंतर अनेक आजी माजी क्रिकेटपटूंनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना धोनीला त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. यात भारताचा विद्यमान कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे.
विराटने धोनीबरोबरील फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले आहे की ‘प्रत्येक क्रिकेटपटूला एक दिवस आपला प्रवास थांबवावा लागतो. पण जेव्हा तूम्ही जवळून ओळखत असलेला व्यक्ती असा निर्णय घेतो तेव्हा तूम्ही खूप भावनिक होता. तू (धोनी) जे देशासाठी केले ते सर्वांच्या हृदयात राहिल. परंतु मला तुझ्याकडून मिळालेला परस्पर आदर आणि उबदारपणा नेहमीच माझ्याबरोबर राहील. जगाने तूझे यश पाहिले, मी तूझ्यातील व्यक्ती पाहिला. माझा कर्णधार, सर्व गोष्टींसाठी धन्यवाद.’
Every cricketer has to end his journey one day, but still when someone you've gotten to know so closely announces that decision, you feel the emotion much more. What you've done for the country will always remain in everyone's heart…… pic.twitter.com/0CuwjwGiiS
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2020
but the mutual respect and warmth I've received from you will always stay in mine. The world has seen achievements, I've seen the person. Thanks for everything skip. I tip my hat to you ???????????? @msdhoni
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2020
धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने भारताच्या तिन्ही प्रकारच्या संघाचे नियमित कर्णधारपद स्विकारले होते. धोनीने आजपर्यंत त्याच्या कारकिर्दीत ५३८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने १७ हजारांहून अधिक धावा केल्या.