---Advertisement---

“विराट कोहली दबावात? पाकिस्तान सामना सुरू होण्यापूर्वी खळबळजनक विधान!”

On: शुक्रवार, फेब्रुवारी 21, 2025 7:15 PM
---Advertisement---

भारतीय संघाने बांगलादेशला हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार सुरुवात केली. शुबमन गिलने शतक झळकावत 101 धावा केल्या. याशिवाय रोहित शर्मा केएल राहुल यांनी सुद्धा चांगली फलंदाजी केली. विराट कोहलीने 28 चेंडूत 22 धावा केल्या. व नंतर तो बाद झाला. आता 23 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येणार आहेत. रविवारी भारत आणि पाकिस्तान संघामध्ये सामना खेळला जाणार आहे. आता हा प्रश्न उपस्थित होत आहे की, पाकिस्तानच्या विरुद्ध सामन्यात विराट कोहली त्याच्या फॉर्ममध्ये परत आलेला दिसेल का?

तत्पूर्वी भारतीय संघाचा माजी फलंदाज रॉबिन उथप्पाने विराट कोहलीच्या फॉर्मवर मोठे वक्तव्य केल आहे. रॉबिन उथप्पा म्हणाला की, विराट कोहली महान खेळाडू आहे. त्याचा तोच स्वतःवर काम करेल. या गोष्टी त्याच्या मनात चालू असतील. विराट कोहली त्याच्याकडून चांगली फलंदाजी करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल. कारण त्याची बॅट दुसऱ्या स्लिप आणि पहिल्या स्लिप मधून येते पण जेव्हा विराट कोहली चांगल्या लय मध्ये खेळतो तेव्हा त्याची बॅट दुसऱ्या व तिसऱ्या स्लिप मध्ये येते. यावेळी आपण पाहिलं तर विराट कोहलीची बॅट पहिल्या स्लिप मधून चेंडूपर्यंत जात आहे. यानंतर कवर ड्राइव खेळण्याच्या नादात तो बाद होत आहे.

तसेच 23 फेब्रुवारी रोजी रविवारी भारत आणि पाकिस्तान संघ दुबई इंटरनॅशनल स्टेडियम मध्ये समोरासमोर असणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी चाहते खूप आतुर आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता सुरू होईल. याआधी भारतीय संघाने बांगलादेशला हरवून 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच पाकिस्तान संघ न्यूझीलंडकडून 60 धावांनी पराभूत झाला आहे. आता भारत पाकिस्तान सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा 

भारत-पाकिस्तान क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक ‘प्लेयर ऑफ द मॅच’ विजेते कोण?

चॅम्पियन्स ट्राॅफीतून पाकिस्तानचा पत्ता कटणार? कसे असणार समीकरण?

IND vs PAK: टाॅस हरणार तो संघ सामना गमावणार! पाहा धक्कादायक आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---