भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा एकदिवसीय सामना कोलंबो या मैदानावर खेळला जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यामधील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील हा अंतिम सामना आहे. पहिला एकदिवसीय सामना बरोबरीत सुटला. तर दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेनं भारताचा 32 धावांनी पराभव केला. दोन्ही सामन्यात भारताची फलंदाजी कमकुवत ठरली. परंतू तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघात दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
तत्पूर्वी अंतिम सामन्यात श्रीलंकन कर्णधार चरिथ असलंकानं टाॅस जिंकला आणि फलंदाजीचा निर्णय घेतला. संघाचा स्टार फिरकीपटू महीश तीक्ष्णानं संघात पुनरागमन केलं आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मानं टाॅसदरम्यान सांगितलं की, रियान पराग (Riyan Parag) आणि रिषभ पंत (Rishabh Pant आजच्या सामन्यात खेळताना दिसतील. त्या दोघांना केएल राहुल आणि अर्शदीप सिंगच्या जाग्यावर संघात स्थान दिलं आहे. युवा खेळाडू रियान परागनं (Riyan Parag) भारतीय संघाकडून पदार्पण केलं आहे.
भारत आणि श्रीलंका एकदिवसीय मालिकेत श्रीलंका संघ 1-0 अशा आघाडीवर आहे आणि एक सामना बरोबरीत सुटला आहे. त्यामुळे भारतीय संघाला मालिका जिंकता येणार नाही. परंतू त्यांना आजचा सामना जिंकून मालिकेत बरोबरी करता येईल. जर भारतीय संघानं सामना गमावला तर 27 वर्षांनंतर भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिका गमावणार आहे.
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी दोन्ही संघ-
भारत- रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रियान पराग, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
श्रीलंका- पाथुम निसांका, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), सदीरा समरविक्रमा, चरिथ असालंका (कर्णधार), जेनिथ लियानागे, कामिंडू मेंडिस, दुनिथ वेलालागे, महेश थीक्ष्णा, जेफ्री वेंडरसे, असिथा फर्नांडो
महत्त्वाच्या बातम्या-
काल 2 किलो जास्त होतं विनेशचं वजन! रात्रभर प्रयत्न केले, व्यायाम केला; तरीही 100 ग्रॅम राहिलं
अपात्रतेची बातमी ऐकून विनेश फोगटची तब्बेत बिघडली, पॅरिसमधील रुग्णालयात दाखल
2 कुस्तीपटू आणि 2 मोठे वाद; विनेश फोगट आणि निशा दहिया यांच्याकडून पदक हिसकावले?