आयपीएल २०२१ चा १९ वा सामना रविवारी (२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) यांच्यात वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे झाला. या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद १९१ धावा केल्या आणि बेंगलोरला १९२ धावांचे आव्हान दिले होते. सीएसकेसाठी रविंद्र जडेजा आणि फाफ डू प्लेसिसने अर्धशतके झळकावली. जडेजाने अखेरच्या षटकात तुफान फटकेबाजी करत अनेक विक्रमांची नोंद केली.
अखेरच्या षटकात जडेजाने केली धुलाई
सीएसकेच्या डावातील अखेरचे षटक आत्तापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवून पर्पल कॅप आपल्याकडे राखलेला हर्षल पटेल टाकण्यासाठी आला. तोपर्यंत चेन्नईने १९ षटकात १५४ धावा बनविल्या होत्या. तर, हर्षलने ३ षटकात ३ बळी मिळवताना केवळ १४ धावा दिलेल्या. मात्र, अखेरच्या षटकात फलंदाजी करणाऱ्या रवींद्र जडेजाने षटकाला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडी षटक बनवून टाकले. त्याने या षटकात पाच षटकार व एका चौकारासह ३७ भावा कुटल्या.
आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे षटक
रवींद्र जडेजाने हर्षल पटेलच्या एका षटकात ठोकलेल्या ३७ धावा आयपीएल इतिहासातील एका षटकातील सर्वाधिक धावा ठरल्या. एकाच षटकात आयपीएलमध्ये ३७ जाण्याची ही दुसरी वेळ आहे. तसेच, आयपीएलमध्ये एका षटकात ३७ धावा बनवणारा सीएसके दुसरा संघ ठरला. यापूर्वी, २०११ आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर व कोची टस्कर्स केरला यांच्यातील सामन्यात एकाच षटकात ३७ धावा ठोकल्या गेल्या होत्या. ख्रिस गेलने कोचीचा वेगवान गोलंदाज प्रशांत परमेश्वरनच्या षटकात ही कामगिरी केली होती.
चेन्नईची सन्मानजनक धावसंख्या
मुंबईतील या अखेरच्या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि फाफ डू प्लेसिस यांनी सीएसकेला ७४ धावांची सलामी दिली. प्लेसिसने सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक साजरे केले. मधल्या षटकांत संघाचे धावते काहीशी कमी झाली. मात्र अखेरीस जडेजाने २८ चेंडूत ठोकलेल्या ६२ धावांच्या जोरावर सीएसकेने १९१ धावा धावफलकावर लावल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजा समोर थंडावते आहे ‘या’ स्फोटक फलंदाजाची बॅट, तब्बल पाच वेळा झालाय बाद
सर जडेजाने केली हर्षल पटेलची धुलाई, एकाच षटकात ३६ धावा कुटत घातली ‘या’ विक्रमाला गवसणी
आरसीबीविरूद्ध षटकार मारताच रैनाचे झाले ‘हे’ आगळेवेगळे द्विशतक पूर्ण