अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्वाखाली भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघाला विजय मिळवण्यात यश आले होते. या मालिकेत शार्दुल ठाकूरने (Shardul thakur) मोलाची भूमिका बजावली होती. तसेच दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर देखील त्याने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. आता तो वेस्ट इंडिज विरुध्द होणाऱ्या वनडे आणि टी२० मालिकेसाठी अहमदाबादमध्ये दाखल झाला आहे. दरम्यान त्याची तुलना आता हार्दिक पंड्यासोबत (hardik Pandya) होऊ लागली आहे. याबाबत त्याने आपले मत मांडले आहे.
शार्दुल ठाकूरला प्रश्न विचारण्यात आला होता की, “भारतीय संघ वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूच्या शोधात आहे. तर तू त्याची जागा घेऊ शकतो का?” या प्रश्नाचे उत्तर देत शार्दुल ठाकूर म्हणाला की, “हार्दिक लवकरच फिट होईल. आमच्या दोघांची फलंदाजी करण्याची शैली वेगवेगळी आहे. हार्दिक ५ व्या किंवा ६ व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. तर मी ७ व्या किंवा ८ व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. त्यामुळे आमच्यात कोणतेही स्पर्धा नाही. मी त्याची जागा घेण्याचा विचार करत नाही. तो मला त्याचे अनुभव सांगत असतो आणि मी देखील तेच करत असतो. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये जर एकापेक्षा अधिक अष्टपैलू खेळाडू येत असतील तर ही चांगलीच गोष्ट आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी स्वतः ला एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहतो. कारण दिवसाच्या शेवटी हे पाहिलं जातं की, तुम्ही गोलंदाजी चांगली केली की फलंदाजी. जेव्हा जेव्हा आपण खेळतो तेव्हा चांगली कामगिरी करावीच लागते. जेव्हा फलंदाजी करत असतो त्यावेळी स्वतः ला एक फलंदाज म्हणून धावा करायच्या. तर गोलंदाजी करताना देखील सारखेच असते. जेव्हा मी फलंदाजी करतो तेव्हा मी स्वतः ला फलंदाज समजतो. तर गोलंदाजी करताना स्वतःला गोलंदाज समजत असतो.”
तसेच आपल्या फलंदाजीबाबत बोलताना शार्दुल ठाकूर म्हणाला की, “फलंदाजी करण्याचे कौशल्य माझ्यात आधीपासूनच होते. परंतु मध्यंतरी मला फलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. मुख्यतः रणजी ट्रॉफी स्पर्धेत. जेव्हा भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली त्यावेळी मी इतर गोलंदाजांपेक्षा चांगली फलंदाजी करायचो. हे रवी शास्त्रींनी पाहिले आणि मला ८ व्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. मला जेव्हा जेव्हा नेटमध्ये फलंदाजी करण्याची संधी मिळते, ती मी सोडत नाही. खालच्या फळीतील फलंदाजांचे योगदान खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे अनेक वर्षे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाने चांगली कामगिरी केली आहे.”
महत्वाच्या बातम्या :
U19 वर्ल्डकप: ‘यंग इंडिया’चा ऑस्ट्रेलियावर दिमाखदार विजय; सलग चौथ्यांदा केला अंतिम फेरीत प्रवेश
भारत दौऱ्यानंतर श्रीलंकेचा ‘हा’ गोलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटला करणार अलविदा, नावे आहेत २८५ विकेट्स
कडक! आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनपूर्वी ‘थाला’ने घेतली ‘अपिरिचित’ची भेट; फोटो भन्नाट व्हायरल