---Advertisement---

दुसरी कसोटी जिंकूनही टीम इंडियाच्या ‘या’ दोन खेळाडूंबाबत मॅनेजमेंट घेणार कठोर निर्णय? संघातून बाहेर काढण्याची शक्यता

On: गुरूवार, फेब्रुवारी 8, 2024 7:00 PM
Team India
---Advertisement---

टीम इंडिया आणि इंग्लंड संघ यांच्या सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. इंग्लंड संघ भारत दौऱ्यावर असून यातील दोन सामने झालेत. ज्यात कसोटी 1-1 अशा बरोबरीत आहे. विशाखापट्टणम येथील दुसऱ्या कसोटीत भारताने पाहुण्या इंग्लंडचा दणदणीत पराभव केला. आता तिसरी कसोटी 15 तारखेपासून सुरु होणार आहे, तत्पुर्वी भारतीय संघाची उर्वरित तीन कसोटीसाठी घोषणा होणार आहे. यात भारताच्या कोणत्या खेळाडूंना टीममध्ये घेतले जाणार आणि आताच्या कोणत्या खेळाडूला डच्चू मिळणार, याबाबत अनेक अंदाज लावले जात आहेत.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामधील तिसरा कसोटी सामना गुजरातमधील राजकोटमध्ये 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या सामन्यामध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग 11 मध्ये बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाने दुसरा कसोटी सामना जिंकला असला तरीसुद्धा संघात बदल होणार हे निश्चित आहे. तिसऱ्या सामन्यामध्ये के. एल. राहुल आणि रविंद्र जडेजा माघारी परतणार असल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे निश्चितच काहींना डच्चू मिळू शकतो. (There will be changes in Indian team for Test matches against England)

ज्या खेळाडूंना डच्चू मिळू शकतो, त्यात दोन युवा खेळाडूंची नावे सर्वाधिक घेतली जातात. ते दुसरे तिसरे कोणी नसून रजत पाटीदार आणि मुकेश कुमार हे आहेत. तीन सामन्यांसाठी बीसीसीआय लवकरच संघाची घोषणा करणार आहे. त्यात या दोघांना वगळले जाऊ शकते. तसेच तिसऱ्या सामन्यात मोहम्मद सिराजसुद्धा कमबॅक करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतू प्रत्यक्षात टीम मॅनेजमेंट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा –
– 18व्या अंकुर जोगळेकर मेमोरियल आंतर आयटी कप क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेत व्हेरिटास, यार्डी, टेक महिंद्रा संघांचे विजय
– जगातील नाही, फक्त भारतातील बेस्ट बॅटर? विराटविषयी काय बोलून गेला मोहम्मद शमी
– पंतच्या फिटनेसबाबत सर्वात मोठी अपडेट! पाँटिंग म्हणतोय, ‘तो आयपीएल खेळेल, पण…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---