---Advertisement---

IPL 2025: बीसीसीआयच्या ‘या’ नियमामुळे विदेशी खेळाडूंना फुटला घाम? काय आहे नियम?

---Advertisement---

18व्या आयपीएल (IPL 2025) हंगामाची सुरूवात (22 मार्च) पासून होईल. तत्पूर्वी बीसीसीआयने (BCCI) इंग्लंडच्या हॅरी ब्रूकवर 2 वर्षांची बंदी घालून खळबळ उडवून दिली आहे. इंग्लंडचा खेळाडू हॅरी ब्रुकने काही दिवसांपूर्वी आयपीएल 2025 मधून आपले नाव मागे घेतले. आता नवीन नियमांनुसार, बीसीसीआयने त्याच्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे विदेशी खेळाडूंना घाम फुटला आहे असा हा नवीन नियम कोणता आहे? चला तर मग या बातमीद्वारे आपण त्या नियमाबद्दल जाणून घेऊया.

आयपीएल 2025च्या मेगा लिलावापूर्वी बीसीसीआयने काही नवीन नियम लागू केले होते. त्यापैकी एक नियम म्हणतो, “जर एखाद्या खेळाडूने लिलावासाठी आपले नाव नोंदवले आणि एखाद्या संघाने त्याला लिलावात खरेदी केले आणि खरेदी केल्यानंतर, जर या खेळाडूने हंगाम सुरू होण्यापूर्वी खेळण्यास नकार दिला, तर या खेळाडूला आयपीएलमधून 2 वर्षांसाठी बंदी घातली जाईल आणि पुढील 2 वर्षे तो लिलावासाठी आपले नाव नोंदवू शकणार नाही.” (BCCI New Rules For IPL 2025)

बीसीसीआयने हंगाम सुरू होण्यापूर्वी स्पर्धेतून आपली नावे मागे घेणाऱ्या खेळाडूंवरच कारवाई केली नाही. तर स्पर्धेत व्हीआयपी संस्कृती पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न केला आहे. नवीन नियमांनुसार, कोणत्याही खेळाडूच्या कुटुंबातील सदस्यांना ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश दिला जाणार नाही. सामना सुरू असो किंवा खेळाडू सराव करत असो, कुटुंबातील सदस्यांनी ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करावा याबाबत बीसीसीआय खूप कडक आहे. याशिवाय, फक्त तेच सपोर्ट स्टाफ ड्रेसिंग रूममध्ये प्रवेश करू शकतील ज्यांना बीसीसीआयची परवानगी मिळेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---