fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

…ह्या आहेत अभिलाषा म्हात्रे यांच्या महाराष्ट्रातील आवडत्या महिला कबड्डीपटू

अर्जुन पुरस्कार विजेत्या, माजी भारतीय कबड्डी संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे यांनी खेल कबड्डी डॉट इन (khelkabaddi.in) या वेबसाईटच्या फेसबुक पेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना त्यांच्या आताच्या आवडत्या खेळाडूंची नाव सांगितली.

यावेळी एका चाहत्याने अभिलाषाला, “आताच्या महिला कबड्डीपटू पैकी तुम्हाला कोण आवडतात ?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना अभिलाषाने दोन नाव सांगितली. सोनाली शिंगटे व सायली केरीपले माझ्या आवडत्या खेळाडु आहेत.

सोनाली बद्दल बोलताना त्यांनी सागितलं की, “सोनालीला मी महाकबड्डी लीग मध्ये बघितलं होत तेव्हाच तिला मी ओळखला होत. तिच्या सोबत महाराष्ट्र संघात खेळता आलं नाही, पण तिच्या सोबत मी कॅम्प व इतर स्पर्धेत खेळले आहे. ती फक्त खेळत नाही तर खेळताना विचार करते. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंची गुणवत्ता बघून ती डावपेच आखते. तसेच तिच्याकडे खुप आत्मविश्वास आहे. पण तिच्याबद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे ती एक चांगल्या खेळाडु बरोबर एक चांगली माणूस आहे. आपण जेवढी मेहनत घेतोय तेवढीच अपेक्षा ती ठेवते, हे गुण सोनाली मध्ये आहेत.”

“महाराष्ट्रातील दुसरी खेळाडु म्हणजे सायली केरीपले, सोनाली प्रमाणेच सायली मध्ये खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे. त्यामुळे त्या खेळात यशस्वी होतात. सायली बद्दल महत्वाची गोष्ट म्हणजे ती कोणत्याही परिस्थितीत हतबल होत नाही. कोणत्याही परिस्थितीत ती सामना खेळताना लढाऊवृत्तीने खेळते. समोर कितीही मोठा प्रतिस्पर्धी असला तरी ती तिच्याच पद्घतीने खेळते. ती स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवते.”

खेळ कबड्डी लाईव्ह सेशन मध्ये बोलताना अभिलाषा म्हात्रे यांनी सोनाली शिंगटे व सायली केरीपले यांना भविष्यातील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या. दोघांनी मेहनत घेऊन महाराष्ट्राचे नाव मोठं करावं अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली.

Arjun Awardee & Former Indian Kabaddi Team Captain Abhilasha Mhatre Patil Live…

Khel Kabaddi ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 7, 2020

You might also like