रेल्वेचा राष्ट्रीय कबड्डीपटू श्रीकांत जाधव (Shrikant Jadhav) याने आपल्याला पाच राष्ट्रीय खेळाडूंची (National Kabaddi Player) नावे जाहीर केली आहेत. खेल कबड्डी डॉट इन (khelkabaddi.in) या वेबसाईटच्या फेसबुक पेजवरून आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना श्रीकांतने हे वक्तव्य केले.
यावेळी एका चाहत्याने श्रीकांतला, “महाराष्ट्राचे तुझे आवडते पाच राष्ट्रीय खेळाडू कोण?” असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे उत्तर देताना श्रीकांतने खालील खेळाडूंची नावे घेतली.
नितीन मदने, विशाल माने, प्रवीण नेवाळे, विलास जाधव, सदानंद शेट्टी हे माझे पाच आवडते राष्ट्रीय कबड्डीपटू आहेत. हे असे श्रीकांत जाधव ने सांगितले.
सध्या रेल्वेकडून (Indian Railway) खेळत असलेल्या श्रीकांतने संधी मिळाल्यास आपल्याला महाराष्ट्राकडून खेळण्यास आवडेल असेही सांगितले. मला एकदा तरी महाराष्ट्राकडून खेळण्याची इच्छा आहे असे तो म्हणाला.
जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ६७ व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत श्रीकांतने रेल्वेकडून खेळताना विजेतेपद मिळवले. या स्पर्धेत त्याला संघात खेळण्याची कमी संधी मिळाली. मिळालेल्या संधी श्रीकांत ने ९ गूण नोंदवत संघाच्या विजयास हातभार लावला.
https://www.facebook.com/OfficialKhelKabaddi/videos/509325719955985/