टी-20 विश्वचषक 2022 चा दुसरा उपांत्य सामना भारत आणि इंग्लंडमध्ये खेळला गेला. भारतीय संघाला या सामन्यात 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर भारत विश्वचषकातून बाहेर पडला असून संघ आणि व्यवस्थापनावर जोरदार टीका होताना दिसत आहे. कर्णधार रोहित शर्मा प्रामुख्याने टीकाकारांच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे.
रोहित शर्मा (Rohit Sharma) विश्वचषकादरम्यान, फलंदाजी आणि नेतृत्व या दोन्ही गोष्टींमध्ये अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही, असे चाहत्यांना वाटत आहे. अशात त्याला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पंड्या (Hardik Pandya ) याचे नाव संघाच्या नवीन कर्णधाराच्या रूपात चाहते सुचवत आहेत. आपण या लेखात पाच कराणे विचारत घेऊ ज्यामुळे हार्दिक संघाच्या कर्णधाराच्या रूपात चांगली कामगिरी करेल, असे वाटते.
क्रमांक 1 –
जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक भारताने आजपर्यंत फारच कमी अष्टपैलू कर्णधार पाहिले आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-20 विश्वचषकात गुरुवारी उपांत्य सामना गमावला आणि स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. अशात रोहितला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी चाहत्यांकडून केली जात आहे. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) गेल्या कित्येक वर्षात टीम इंडियाला मिळालेला सर्वोत्तम अष्टपैलू आहे. संघाला विजय मिळवून देण्यात पंड्याचा कायमच मोठा वाटा असतो. तो गोलंदाजी व फलंदाजी अशा दोन्ही आघाड्यांवर उत्तम कामगिरी करतो.
क्रमांक 2 –
अष्टपैलू हार्दिक पंड्याचा फिटनेस ही जबरदस्त आहे. हार्दिकने मागच्या काही वर्षात स्वतःच्या फिटनेसवर चांगलेच काम केल्याचे आपल्याला दिसते. टी-20 विश्वचषक 2021 मध्ये हार्दिकची फिटनेस हवी तितकी चागंली नव्हती आणि त्याला दुखापतीनंतर गोलंदाजी देखील करता येत नव्हती. मागच्या वर्षीच्या या विश्वचषकात भारतीय संघ उपांत्य फेरीत देखील पोहोचला नव्हता. यानंतर हार्दिक मोठ्या विश्रांतीवर गेला होता आणि त्याने यादरम्यानच्या काळात फिटनेसवर खूप मेहनत घेतल्याचे दिसते. विश्रांतीच्या काळात त्याने फिटनेस मिळवली आणि आयपीएल 2022 मध्ये जोरदार पुनरागमन केले.
क्रमांक 3 –
कर्णधाराच्या रूपात हार्दिक पंड्या स्वतःला आधीच सिद्ध करून बसला आहे. त्याने मागच्या वर्षी आयपीएलमध्ये पहिल्यांदा खेळणाऱ्या गुजरात टायटन्सला आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली. आयपीएलमध्ये पहिल्यांदाचा कर्णधाराची भूमिका पार पाडणाऱ्या हार्दिकचे प्रदर्शन जबरदस्त राहिले. त्याने वैयक्तिक खेली तर चांगली होतीच, पण कर्णधार म्हणून ज्या काही आवश्यक बाबी असतील त्या सर्व हार्दिकने चोख पार पाडल्या. हार्दिक स्वतःच्या संघातील खेळाडूंना ज्या पद्धतीने पारखू शकतो, त्या पद्धतीने विरोधी संघातील खेळाडूंची क्षमता देखील त्याला समजते.
क्रमांक 4 –
सध्या हार्दिक पंड्याचे वय 29 वर्ष आहे. त्यामुळे त्याच्याकडे भारतीय संघासाठी खेळण्याचा अजून मोठा काळ बाकी आहे. त्यामुळे जर योग्य वेळी संधी मिळाली, तर तो संघाला कर्णधाराच्या रूपात पुढे घेऊन जाऊ शकतो. सध्या सर्व विभागांमध्ये आघाडीवर असेलेला दुसरा कोणताच खेळाडू कर्णधारपदासाठी संघात उपलब्ध नाहीये. त्यामुळे हार्दिककडे स्वतःला सिद्ध करण्यासाठी अजून बराच वेळ आहे.
क्रमांक 5 –
हार्दिक पंड्या एक सकारात्मक दृष्टीकोण असलेला खेळाडू आहे. संघातील इतर खेळाडूंसोबत त्याचे नाते अगदी जिव्हाळ्याचे आहे. संघ दबावात असताना तो अगदी सकारात्मक विचारसरणीने खेळत असतो. त्यामुळे त्याच्या सकारात्मकतेचा संघाला नक्कीच फायदा मिळत असतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
करोडोंची फी घेऊनही द्रविड देऊ शकला नाही रिझल्ट! वाचा वर्षभरातील कामगिरी
‘बिलियन डॉलर इंडस्ट्रीचा संघ मागेच राहिला अन् आम्ही…’, पीसीबी अध्यक्षांनी भारताच्या जखमेवर चोळलं मीठ