क्रिकेट आणि फुटबॉल. जागतिक पातळीवर सगळ्यात प्रसिद्ध असलेले हे दोन खेळ. हे दोन्ही खेळ ‘गोऱ्या साहेबांनी’ म्हणजेच ‘इंग्लंडने’ जगाला दिलेली अमूल्य देणगी आहे. परंतु या दोन्ही खेळांमध्ये असलेला एक आमूलाग्र फरक म्हणजे ‘ट्रान्स्फर विंडो’ होय. ट्रान्स्फर विंडो म्हणजे काय? तर फुटबॉलमध्ये एका वर्षाच्या कालावधीत दोन ट्रान्सफर विंडो असतात, ज्यात खेळाडूला एका संघातून दुसऱ्या संघात बदली करता येते.
जर आयपीएल मध्येही ‘ट्रान्सफर विंडो’ सुविधा उपलब्ध असती; तर वर्तमान काळात काही भारतीय खेळाडू परदेशी लीगमध्ये खेळताना दिसले असते.
रवींद्र जडेजा (पेशावर जालमी)
रवींद्र जडेजा, टी20 क्रिकेटमधील हा सर्वाधिक मागणीचा अष्टपैलू खेळाडू कुठल्याही प्रकारच्या गोलंदाजांचा सामना करू शकतो आणि परिस्थितीनुरूप खेळाची दिशा बदलून सामना पालटू शकतो. त्यासोबतच जडेजा एक शानदार फिरकीपटू आणि एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक देखील आहे. जर आयपीएलमध्ये ट्रान्सफर विंडोची सुविधा असती तर जडेजा पाकिस्तान सुपर लीगमध्ये पेशावर जालमी संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसला असता. कारण या संघाला एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूची गरज आहे आणि आणि जडेजाने ती उणीव नक्कीच भरून काढली असतील.
जसप्रीत बुमराह (ऍडलेड स्ट्रायकर)
क्रिकेटविश्वातील कोणताही फलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करायला कचरतो. या सोबतच फिरकीपटू राशिद खान असेल तर बोलायलाच नको. बिग बॅश लीग स्पर्धेत ऍडलेड स्ट्रायकर संघातर्फे खेळणाऱ्या राशिद खानसोबत जर जसप्रीत बुमराह जोडला गेला असता; तर त्याच्या संघाे नक्कीच पात्रता फेरी गाठली असती. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने आपल्या आयपीएल कारकिर्दीच्या 99 सामन्यात 115 बळी घेतले आहे.
रिषभ पंत (हॉबर्ट हॅरीकेन)
भारतीय संघाकडून खेळताना यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत जबरदस्त कामगिरी करत आहे. पंत हा एक विस्फोटक खेळाडू मानला जात असला, तरी या आयपीएल स्पर्धेत एका जबाबदार कर्णधाराची भूमिका तो वठवत आहे. जर फुटबॉलप्रमाणे पंतला ट्रान्सफर विंडो सुविधा मिळाली असती. तर पंत बीबीएल स्पर्धेत हॉबर्ट हॅरीकेन संघाचे प्रतिनिधित्व केले असते. कारण टीम पेन नेतृत्व करीत असलेल्या या संघाला मधल्या फळीत पंतसारख्या विस्फोटक फलंदाजाची आवश्यकता आहे. जो कोणत्याही गोलनंदाजीवर तुटून पडू शकतो.
रोहित शर्मा (पर्थ स्कॉचर)
रोहित शर्मा, भारतीय संघातील अफाट गुणवत्ता लाभलेला हा खेळाडू ज्याची फलंदाजी पाहणे जणू पर्वणीच. जगातला कोणताही गोलंदाज रोहित शर्मासमोर फिका वाटतो. हा एकमात्र फलंदाज आहे ज्याने टी20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तब्बल 4 शतके लगावली आहेत.
रोहित शर्मा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. जर फुटबॉलसारखी ‘ट्रान्सफर विंडो’ सुविधा आयपीएलमध्ये असती तर बीबीएल स्पर्धेत पर्थ स्कॉचर संघाचे त्याने प्रतिनिधित्त्व केले असते. या स्पर्धेत हिटमॅन जेसन रॉय किंवा कुलीन मुनरोसारख्या फलंदाजांसोबत विरोधी गोलंदाजीवर तुटून पडला असता.
महेंद्रसिंग धोनी (त्रिनबागो नाईट रायडर्स)
भारतीय क्रिकेटला लाभलेला क्रिकेटच्या सर्वच प्रकारातील यशस्वी कर्णधार म्हणजे एमएस धोनी. धोनीने टी20 विश्वचषक असो, वनडे विश्वचषक असो वा आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी, सगळ्यांवर आपल्या संघाचे नाव कोरले आहे. आयपीएल स्पर्धेत 3 वेळा त्याने चेन्नईला विजयी किताब मिळून दिला आहे. धोनी कॅरेबियन स्पर्धेच्या ‘त्रिनबागो नाईट रायडर्स’ संघासाठी एक उत्तम खेळाडू आहे. या संघात आधीच कायरॉन पोलार्डसारखा खेळाडू आहे. त्यात धोनी त्याच्यासोबत फलंदाजीला उतरल्यास विरोधी संघ उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही.
विराट कोहली (कराची किंग्ज)
वर्तमान क्रिकेटमध्ये ज्या 2 खेळाडूंची तुलना सगळ्यात जास्त तुलना होते ते म्हणजे भारतीय दिग्गज विराट कोहली आणि पाकिस्तानचा बाबर आजम होय. जर आयपीएलमध्ये फुटबॉलसारखी ‘ट्रान्सफर विंडो’ सुविधा असती; तर हे दोघे खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये कराची किंग्ज संघाकडून खेळताना दिसले असते. ‘कव्हर ड्राईव्ह’ हा या दोन्ही खेळाडूंचा आवडता फटका. जर हे दोन्ही खेळाडू एकत्र असते तर नक्कीच संघाला फायदा झाला असता.
महत्त्वाच्या बातम्या-
वनडे कारकिर्दीची दणक्यात सुरुवात करणारे ३ भारतीय, एकाने पदार्पणात केलं शतक
अनुभवी भुवनेश्वर कुमार इंग्लंड दौऱ्यावर दुर्लक्षित, ‘ही’ आहेत त्यामागची प्रमुख कारणे
लॉर्ड्स कसोटीवर न्यूझीलंडची पकड, कॉनवेच्या ऐतिहासिक द्विशतकानंतर गोलंदाजांची शानदार कामगिरी