काल एशिया कपचे बिगूल बांग्लादेश-श्रीलंका यांच्यातील लढतीने वाजले. बांग्लादेशने विजय मिळवून आपली वाट सुकर करुन घेतली आहे. आता भारत-पाकिस्तान या बहुप्रतिक्षित सामन्याची सगळ्यांच उत्सुकता लागली असणार आहे.
त्या आधी हे पारंपारिक प्रतिस्पर्धी आपापला सोपा सामना हाँगकाँग विरुद्ध आज पाकिस्तान आणि 18 सप्टेंबर भारत खेळणार आहे. या स्पर्धेत विराट कोहली खेळणार नसल्याने पाकिस्तानला आनंद झाला असेल तरीदेखील पाकिस्तानने मात्र आपला सर्वोत्तम संघ मैदानात उतरवला आहे.
पाकिस्तानने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फाइनलमध्ये भारताचा दारुण पराभव केला होता. तसेच पाकिस्तानने झिंब्बॉंबेचा नुकताच वनडे मालिकेत 5-0 असा धुव्वा उडवला होता. त्यामुळे त्यांनी याच दौऱ्यातील संघ कायम ठेवला आहे.
पाकिस्तान संघ सध्या चांगल्या लयीत आहे, त्यांचे फलंदाज, गोलंदाज उत्तम आहे. भारताला पाकिस्तान संघ आणि त्यातले कोणते खेळाडू सर्वाधिक त्रास देऊ शकतात याचा थोडक्यात आढावा आपण बघूया.
हे पाकिस्तानचे 5 खेळीडू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात:
फखर जामन –
फखरने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फाइनलच्या अंतिम सामन्यात एक मनमोहक शतक झळकावले आणि भारतासमोर एक कठीण लक्ष ठेवले होते. हा 28 वर्षीय वनडे क्रिकेटमध्ये व्दिशतक झळकावणारा पहिला पाकिस्तानी फलंदाज बनला आहे.. भारताच्या गोलंदाजांनी त्याच्यावर अंकुश ठेवण्याची गरज आहे.
इमाम-उल-हक –
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज इंजमाम-उल-हक याचा पुतण्या आहे. क्रिकेट याच्या रक्तातच आहे. 22 वर्षीय इमामने आपल्या वनडे कारकिर्दीत नऊ डावांत चार शतके झळकविली आहेत. फखार जमान याच्याशी भागीदारी अलीकडील पाकिस्तानच्या यशाची पार्श्वभूमी आहे. सुरुवातीची झालेल्या भागीदारी पासून होणारे नुकसान टाळणे हे करणे ही भारताची प्राथमिक चिंता असली पाहिजे.
बाबर आझम-
पाकिस्तानचा सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून बाबर आझमची ओळख आहे. 23 वर्षीय बाबर आझमने युएई मध्ये खेळलेल्या 11 डावात 5 शतक झळकावली आहेत. याची विकेट अतिशय महत्वाची असून पाकिस्तानच्या डावाची सर्व समीकरण बदलू शकते.
शादाब खान
जेव्हा आशिया खंडात सामना असतो तेव्हा हा फिरकी गोलंदाज कोणत्याही संघासाठी घातक ठरू शकतो. भारतीय फलंदाजांना याचा सामना काळजीपूर्वक करावा लागणार आहे. तो बॅटच्या साहाय्याने फलंदाजीला आधार देऊ शकतो. त्याच्या अष्टपैलू कामगिरीने संघाची ताकद आणि गती वाढते.
हसन अली –
पाकिस्तानकडे नेहमीच दर्जेदार वेगवान गोलंदाज संघात असतात. हसन अली पाकिस्तानच्या अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे आणि त्याच्या गोलंदाजीमुळे सामन्यावर फरक पडेल. उपयुक्त परिस्थितीत रिव्हर्स स्विंग करण्यात याचा हातखंड आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–क्रिकेटनंतर श्रीसंतचा मोर्चा या टीव्ही शोकडे
–किदांबी श्रीकांतचे खराब कामगिरींचे सत्र सुरूच